Numerology horoscope Today 24 December 2024 : तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २३ असेल तर तुमचा मूलांक २+३=५ आहे. जन्मतारखेनुसार चला जाणून घेऊया मंगळवार २४ डिसेंबरचा तुमचा दिवस कसा राहील.
आज अंक १ च्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक जीवनात सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवसायात नफा वाढेल. यशाचे नवे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील, परंतु आज पैशांचे व्यवहार करणे टाळा.
अंक २ च्या लोकांसाठी शुभ दिवस. नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नाविन्यपूर्ण कल्पनांसह नवीन कामाची जबाबदारी घ्या.
अंक ३ असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात नफा वाढेल. घरात सुख-शांती राहील. आपल्या कामाचे इच्छित परिणाम मिळतील. ऑफिसची कामगिरी भन्नाट असेल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रिय व्यक्तींकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. नेतृत्व गुण यशाची पायरी चढतील.
अंक ४ असलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात फायदा होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. करिअरमधील अडथळे दूर होतील. सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घ्याल. नवीन कौशल्ये शिका. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. घाईगडबडीत पैसे खर्च करणे टाळा.
अंक ५ च्या लोकांना नशीब साथ देईल. पैशाच्या आवकेचे नवे मार्ग उपलब्ध होतील. प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरी आणि व्यवसायात तुमची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली राहील. मित्र परिवाराच्या सहकार्याने मन प्रसन्न राहील.
अंक ६ असलेल्या लोकांना आज प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. जीवनात सकारात्मकता वाढेल. ऑफिसमध्ये तुमची कामगिरी अप्रतिम असेल. बॉस कामांचे कौतुक करतील. सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व कामे यशस्वी होतील. प्रिय व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्या.
अंक ७ च्या लोकांना आज सर्व कामांचे आश्वासक फळ मिळेल. जुन्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. व्यवसायात नफा वाढेल. प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
आज अंक ८ असलेले लोक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असतील. आयुष्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यापार-व्यवसायात सर्व काही चांगले राहील. कौटुंबिक सहकार्य मिळेल. नात्यांमध्ये गोडवा येईल. वरिष्ठांच्या सहकार्याने आपण आपल्या करिअरमध्ये प्रगती कराल.
अंक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. हळूहळू नोकरी आणि व्यवसायात प्रगती कराल. व्यवसायात फायदा होईल. स्वप्ने पूर्ण होतील. रखडलेली कामे सुरूच राहतील. सुखसोयींमध्ये राहाल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या