Numerology horoscope Today 16 December 2024 : तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १७ असेल तर तुमचा मूलांक १+७=८ आहे.जाणून घ्या मूलांक १ ते ९ असणाऱ्यांसाठी १६ डिसेंबरचा दिवस कसा राहील, वाचा अंकभविष्य..
मूलांक १ - मूलांक १ असलेल्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक/शुभ कार्ये होऊ शकतात. कपड्यांवरील खर्च वाढू शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून पैसे मिळू शकतात. प्रवास लाभदायक ठरेल. तुम्हाला मित्राकडूनही सहकार्य मिळू शकते.
मूलांक २ - अंक २ असलेल्यांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाची व्याप्ती वाढेल. खर्चाच्या अतिरेकामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. वडिलांच्या तब्येतीचीही काळजी घ्या. मित्राची साथ उत्पन्नवाढीचे साधन बनू शकते.
मूलांक ३ - आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत कार्यक्षेत्रात थोडी सुधारणा होऊ शकते, परंतु धावपळ अधिक होईल. मित्राच्या मदतीने रोजगाराच्या संधी मिळू शकतील, ज्यामुळे उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
मूलांक ४ - मूलांक ४ असलेल्यांचा खर्च कमी होईल. आईची तब्येत सुधारेल. संभाषणात शांत राहा. नोकरीत कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. राहणीमानात सुधारणा होईल. मनःशांती राखण्याचा प्रयत्न करा.
मूलांक ५ - अंक ५ असलेल्या लोकांना शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. व्यवसायात लक्ष द्या, अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मेहनतीचे प्रमाण जास्त असेल. मित्रासोबत सहलीला जाऊ शकता. खर्चात वाढ होईल.
मूलांक ६ - अंक ६ असलेल्यांच्या व्यवसायाची स्थिती सुधारेल. मित्राचे ही सहकार्य मिळू शकते. आईकडून पैसे मिळू शकतात. बौद्धिक कार्यातून लेखन हे उत्पन्नाचे साधन बनू शकते. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
मूलांक ७ - अंक ७ असलेल्या लोकांनी आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही अडचणींचा ही सामना करावा लागू शकतो. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील.
मूलांक ८ - मूलांक ८ असलेल्या लोकांनी व्यवसायात सावध राहा, अडचणी उद्भवू शकतात. नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या व्याप्तीतही बदल होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. कुटुंबातील एखाद्या मोठ्याकडून पैसे मिळू शकतात.
मूलांक ९ - अंक ९ असलेल्या लोकांना मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ही जावे लागू शकते. अधिक धावपळ होईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. उत्पन्नाची स्थिती सुधारेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. )
संबंधित बातम्या