राशीभविष्याप्रमाणे अंकशास्त्रसुद्धा तितकेच महत्वाचे समजले जाते. राशीभविष्यात जसे राशीनुसार व्यक्तींच्या आयुष्यात बदल घडून येतात. तसेच अंकशास्त्रात तुमच्या मूलांकनुसार बदल दिसून येतात. हे मूलांक तुमच्या जन्मतारखेच्या अंकांच्या बेरजेतून ठरवले जातात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २५ एप्रिलला झाला असेल, तर २+५= ७ हा त्याचा मूलांक असेल. तसेच त्याची पूर्ण जन्मतारीख २५-३-१९९६ असेल तर २+५+३+१+९+९+६=३४=७ हा भाग्यांक असेल. अंकशास्त्राच्या मदतीने आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे की, प्रतिकूल आहे हे समजण्यास मदत होते. तुमच्या मूलांकानुसार कोणते कार्य तुम्हाला फायदेशीर ठरेल, कोणता रंग शुभ ठरेल ज्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल, हे समजण्यास सुलभ जाते.
या मूलांकासाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील.त्यामुळे तुमचं कौतुक होईल.एखादे बक्षीस मिळण्याचीसुद्धा शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या सांगायचे झाले तर, उधारी मिळण्यात विलंब झाल्याने तुम्हाला नुकसान सहन करावा लागेल. आज तुमच्यासाठी सिल्व्हर कलर कलर शुभ असणार आहे. तर ५२ हा अंक शुभ ठरणार आहे.
अनेक दिवसांपासून कायदेशीर बाबींत अडकून असाल, तर या प्रकरणांत यश मिळेल. विविध स्वभावाच्या लोकांचा सहवास लाभेल. लोक त्यांच्या सोयीनुसार तुम्हाला समजून घेतील. या मूलांकासाठी राखाडी रंग आज शुभ आहे. तर २२ हा अंकसुद्धा शुभ असणार आहे.
तुमच्या वैचारिक आणि मानसिक धैर्यामुळे तुमचे बळ वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी, सामाजिक ठिकाणी तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास न ठेवता जपून पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. आज या मूलांकाच्या व्यक्तींसाठी हिरवा रंग शुभ असणार आहे. तर अंकांमध्ये १२ ठरणार आहे.
मूलांक ४ साठी आजचा दिवस थोडासा कठीण असणार आहे. कोणत्याही कार्यात आत्मविश्वासाची कमतरता भासेल. परंतु स्वतःचे मनोबल वाढवून संयमाने प्रत्येक काम केल्यास सकारत्मक गोष्टी घडू शकतात. या मूलांकांसाठी क्रीम कलर आज शुभ आहे. तर २ हा अंकही शुभ आहे.
अंकशास्त्रानुसार ५ मूलांक असणाऱ्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून विचार करत असलेल्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. या मूलांकांसाठी पिवळा रंग शुभ असेल. तर १५ हा अंक शुभ असेल.
गेल्या अनेक दिवसांपासून करत असलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कला कौशल्यांची जाणीव होईल. त्यामुळे चांगला आर्थिक फायदा दिसून येईल. या मूलांकांसाठी आज सोनेरी रंग शुभ आहे.तर अंकांमध्ये ३ अंक शुभ आहे.
मूलांक ७ असणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही ठिकाणी [पैशांची गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करावी. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. आपली क्षमता ओळखून त्या त्या क्षेत्रात पुढे जाणे फलदायी ठरेल. आज या मूलांकांसाठी जांभळा रंग शुभ असणार आहे. तर २७ हा अंकसुद्धा शुभ असणार आहे.
मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींनी कोणतीही योजना अंमलात आणताना आपल्या जोडीदाराचा किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. खास लक्ष देऊन प्रगतीच्या विविध संधी शोधाव्या लागतील. आज तुमच्यासाठी लाल रंग शुभ असणार आहे. त्यासोबतच १४ हा अंकसुद्धा शुभ असणार आहे.
या मूलांकांच्या व्यक्तींना प्रवासाचा योग आहे. या प्रवासामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडून येतील. जुन्या मित्रांना भेटण्याची इच्छा होईल. या मूलांकांसाठी लिंबू कलर आज शुभ असणार आहे. त्याचसोबत १२ हा अंकसुद्धा शुभ असणार आहे.
संबंधित बातम्या