मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology Horoscope : आजच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमचे भाग्य चमकणार? वाचा अंकभविष्य

Numerology Horoscope : आजच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमचे भाग्य चमकणार? वाचा अंकभविष्य

Jun 19, 2024 09:27 AM IST

Ank Jyotish 19 June 2024 : अंकभविष्यात मूलांकावरुन आज कोणता रंग तुमच्यासाठी शुभ असणार किंवा कोणता अंक तुमच्यासाठी शुभ असणार हेसुद्धा सांगितले जाते.

अंकभविष्य १९ जून २०२४
अंकभविष्य १९ जून २०२४

अंकज्योतिष शास्त्रात दैनंदिन घडामोडींबाबत अंदाज बांधले जातात. शिवाय एखाद्या व्यक्तीचे गुणदोष, स्वभाव, करिअर, प्रेम जीवन अशा विविध बाबींबाबतदेखील सांगितले जाते. अंकभविष्यात एखाद्या व्यक्तीच्या मूलांकावरुन त्याचे भविष्य सांगण्यात येते. बहुतांश लोकांना मूलांकाबाबत माहिती नाही. तर आपल्या जन्म तारखेच्या बेरजेवरून जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हटले जाते. उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख १२ असेल तर त्यानुसार तुमचा मूलांक ३ असतो. तसेच अंकभविष्यात मूलांकावरुन आज कोणता रंग तुमच्यासाठी शुभ असणार किंवा कोणता अंक तुमच्यासाठी शुभ असणार हेसुद्धा सांगितले जाते. आज बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी लकी आहे ते जाणून घेऊया.

मूलांक १

मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. विविध मार्गाने धनप्राप्ती होईल. त्यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामात आत्मविश्वास वाढेल. मात्र आज आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. शिवाय आरोग्याची काळजी घ्या. नाहीतर पोटासंबंधी तक्रारी त्रास देतील.

शुभ अंक-१

शुभ रंग-केशरी

मूलांक २

मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. भूतकाळात केलेली आर्थिक गुंतवणूक आज फायद्याची ठरणार आहे. आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.

शुभ अंक-८

शुभ रंग-लाल

मूलांक ३

मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज काही प्रमाणात मानसिक तणाव जाणवू शकतो. भागीदारीत व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. हा प्रस्ताव मंजूर केल्यास भविष्यात आर्थिक लाभ मिळेल. दिवसभर डोकेदुखी त्रास देऊ शकते.

शुभ अंक-६

शुभ रंग-निळा

मूलांक ४

मूलांक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला असणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील. व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग जुळून येईल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

शुभ अंक-१०

शुभ रंग-आकाशी

मूलांक ५

मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी दक्ष राहण्याची गरज आहे. अथवा विरोधक गैरफायदा घेऊ शकतात. व्यवसायिकांना मात्र मिळकतीच्या नव्या संधी प्राप्त होतील.

शुभ अंक-२५

शुभ रंग-भगवा

मूलांक ६

मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. उद्योग-व्यापारात मोठा धनलाभ होईल. नोकरदारवर्गाला आज पगारवाढ मिळू शकते. कुटुंबाबतील सदस्यांसोबत मनोरंजक कार्यक्रम बघण्यात वेळ जाईल. एकंदरीत आजचा दिवस फायद्याचा असणार आहे.

शुभ अंक-२६

शुभ रंग-पांढरा

मूलांक ७

मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमचा स्वभाव अध्यात्मिक आणि रचनात्मक गोष्टींमध्ये गुंतून राहील. अचानक धनलाभ होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होऊन विस्तारदेखील होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. नातेसंबंध सुधारतील.

शुभ अंक-१४

शुभ रंग-पिवळा

मूलांक ८

मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा. नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर आज विचार करण्यास हरकत नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक ठिकाणी भेट देण्याची योजना आखाल.

शुभ अंक-२८

शुभ रंग-पिवळा

मूलांक ९

मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. दिवसभर उत्साह जाणवेल. वडिलांच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक केल्यास फायदा होईल. व्यापारात मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल.

शुभ अंक-१८

शुभ रंग-लाल

WhatsApp channel
विभाग