Numerology: ज्योतिषशास्त्रात राशीभविष्याप्रमाणे अंकभविष्यसुद्धा तितकेच महत्वाचे माध्यम आहे. बहुतांश लोक दैनंदिन आयुष्यात दिवसाची सुरुवात करताना अंकशास्त्राचा आधार घेतात. अंकशास्त्रात तुमच्या भविष्यासोबतच तुम्हाला कोणता रंग आणि अंक लाभदायक ठरु शकतो याबाबतही सल्ला दिला जातो. राशीभविष्यात ज्याप्रमाणे राशींवरुन भविष्याचे अंदाज बांधले जातात. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात मूलांकावरून भविष्याचे अंदाज बांधले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन हा मूलांक ठरत असतो. आज शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आणि कोणता अंक किंवा रंग तुमच्यासाठी लकी ठरेल हे अंकभविष्याच्या आधारे जाणून घेऊया.
मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. आज दिवसभर उत्साही राहाल. तुमच्या बोलण्यात नम्रता आणि शिस्त ठेवावी लागेल. अन्यथा इतरांशी वादविवाद होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी खानपानाची विशेष काळजी घ्या. अथवा उच्च रक्तदाब त्रास देऊ शकतो. आज डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.(कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९,२८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो.)
शुभ अंक-३
शुभ रंग-आकाशी
मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अनपेक्षित गोष्टींमधून धनप्राप्ती होईल. अचानक पैसे मिळाल्याने उत्साह वाढेल. मन प्रसन्न राहील. एखाद्या महत्वाच्या कामात मित्रांची आणि भावंडांची साथ लाभणार आहे. मात्र आईवडिलांसोबत प्रेमळ व्यवहार ठेवा अथवा नुकसान भोगावा लागेल. (कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो.)
शुभ अंक-४
शुभ रंग-पांढरा
मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांत रुची वाढेल. कुटुंबासोबत एखादे शुभ कार्य करण्याची योजना आखली जाईल. पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेणे आज अत्यंत शुभ ठरेल. कमाईच्या नव्या मार्गांचा विचार करुन त्यावर अमंलबजावणी कराल. (कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो.)
शुभ अंक-६
शुभ रंग-पिवळा
आज मूलांक ४ च्या लोकांसाठी दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर ताबा ठेवणे शक्य होईल. अचानक एखादी आनंदाची बातमी कानावर पडेल. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल. शिस्तबद्ध राहणे पसंत कराल आणि त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वासाठी फायदाच होईल. ( कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२,३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.)
शुभ अंक-८
शुभ रंग- निळा
मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संपर्कात याल. आणि त्याचा फायदाही होईल. तसेच तुमच्या भावा-बहिणींसोबत जुन्या आठवणीत रमाल. त्यातून मनःशांती लाभेल. फिटनेसबाबत अत्यंत जागरुक व्हाल त्यामुळे व्यक्तिमत्वात बदल होईल. (कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-२५
शुभ रंग-केसरी
मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. महिलावर्गाकडून नवीन कपड्यांची खरेदी होऊ शकते. त्यामुळे मूड आनंदी असेल. मात्र जोडीदारासोबत वादविवाद टाळा. अथवा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. मित्रांमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण निर्माण होईल. (कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-१२
शुभ रंग-निळा
मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावाचा असणार आहे. कुटुंबातील सदस्याची एखादी गोष्ट जिव्हारी लागू शकते. जुने आजार आज त्रास देऊ शकतात. मात्र विदेशी व्यापारात स्वतःचे विचार मांडण्यात यशस्वी व्हाल. मनाने नाही तर बौद्धिक दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय लाभ देऊ शकतात. (कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक-१४
शुभ रंग-पिवळा
मूलांक ८च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्याकडे संशयाने पाहतील. त्यामुळे जपून पाऊले उचला. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-१
शुभ रंग-भगवा
मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उतारांचा असणार आहे. आज तुम्हाला चीड निर्माण करणाऱ्या गोष्टी घडतील. रागामुळे एखादे काम हातातून निसटू शकते. तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे लोक दुरावू शकतात. त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-१८
शुभ रंग-हिरवा
संबंधित बातम्या