मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Bhavishya : आज बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी ठरणार लकी? वाचा अंकभविष्य

Ank Bhavishya : आज बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी ठरणार लकी? वाचा अंकभविष्य

Jun 12, 2024 10:51 AM IST

Numerology Horoscope : गजकेसरी योगात बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी लकी असणार त्याबाबत जाणून घेऊया.

अंकभविष्य, अंकज्योतिष १२ जून २०२४
अंकभविष्य, अंकज्योतिष १२ जून २०२४

सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत अनेक लोक अंकजोतिषवर विश्वास ठेवतात. अंकजोतिष आपल्याला अंकावरुन भविष्य सांगण्याचे काम करते. विशेष म्हणजे अंकशास्त्रात केवळ भविष्यच नव्हे तर आपल्या स्वभावाबाबत, व्यावसाबाबत, लव्ह लाईफबाबत अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो.

अंक शास्त्र हे एक विस्तारित शास्त्र आहे. यामध्ये आपल्या मूलांकावरुन विविध गोष्टींचा खुलासा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन त्याचा मूलांक ठरवला जातो. शिवाय आजच्या दिवशी मूलांकासाठी कोणता रंग आणि अंक शुभ असणार हेसुद्धा यामध्ये सांगितले जाते. तुमच्या मूलांकानुसार बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी लकी असणार ते जाणून घेऊया.

मूलांक १

मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास विशेष लाभ मिळेल. मोठी धनप्राप्ती झाल्याने आत्मविश्वास वाढेल. सायंकाळपर्यंत विविध लाभकारक अनुभव पाहायला मिळतील.

शुभ अंक-११

शुभ रंग-आकाशी कलर

मूलांक २

मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आनंदाची बातमी कानावर पडेल. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी पार्टी करण्याचा योग जुळून येईल.

शुभ अंक-६

शुभ रंग-लाल

मूलांक ३

मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. कार्यक्षेत्रात नवे प्रोजेक्ट मिळतील. त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होऊन प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कमी काळात मोठी प्रगती झाल्याचे दिसून येईल.

शुभ अंक-१

शुभ रंग-हिरवा

मूलांक ४

मूलांक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. उद्योग-व्यापारात मनासारखे यश मिळेल. चांगले आर्थिक लाभ होतील. एखाद्या शुभ कार्यात सहभाग घ्याल. मनावरचा ताण नाहीसा होईल.

शुभ अंक-२४

शुभ रंग-केशरी

मूलांक ५

मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज नव्या लोकांशी मैत्री होऊ शकते. शिवाय बराचसा वेळ प्रवासात खर्च होऊ शकतो. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. आता केलेली बचत भविष्यात फायदेशीर ठरु शकते.

शुभ अंक-१२

शुभ रंग-पांढरा

मूलांक ६

मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वास्थ्य उत्तम राहील. त्यामुळे कामामध्ये उत्साह

जाणवेल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. कुटुंबियांसोबत धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग येईल. मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी घडतील.

शुभ अंक-२८

शुभ रंग-आकाशी रंग

मूलांक ७

मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. आज कार्यक्षेत्रात मात्र प्रगती होईल. व्यावसायिकांना असा एखादा प्रकल्प हाती लागेल, ज्यातून दीर्घकाळासाठी तुम्ही व्यग्र राहाल. त्यामधून आर्थिक लाभसुद्धा मिळेल.

शुभ अंक-१४

शुभ रंग-पिवळा

मूलांक ८

मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. तुमच्या जिद्दीने आणि क्षमतेने कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. आज इतरांशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. अथवा मतभेद होण्याची शक्यता आहे.

शुभ अंक-४

शुभ रंग-लाल

मूलांक ९

मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र रागावर ताबा ठेवा. अथवा तुमच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते.

शुभ अंक-१८

शुभ रंग-हिरवा

WhatsApp channel
विभाग