अंकज्योतिष हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे. अंकशास्त्रात फक्त व्यक्तीचे भविष्यच सांगितले जात नाही तर त्यांचा स्वभाव, गुणदोष, आवडीनिवडी याबाबतदेखील माहिती देण्यात येते. राशीभविष्यात ज्याप्रमाणे राशींच्या आधारे भविष्य समजते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे भविष्य सांगण्यात येते. त्यामुळे अंक भविष्यात मूलांकाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक मूलांक हा वेगवेगळ्या गुणधर्माचा कारक असतो. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळे गुणवैशिष्ट्य असते. आज आपण अशा मुलांबाबत जाणून घेणार आहोत जे एक उत्तम पती असतात आणि आपल्या पत्नीला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांना राणीसारखे आयुष्य देतात.
अंक शास्त्रात मूलांक हा अतिशय महत्वाचा घटक आहे. मूलांकाचा आधार घेऊनच एखाद्या व्यक्तीबाबत विविध गोष्टींचा खुलासा करण्यात येतो. बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे नेमके काय याबाबत अद्याप कल्पना नाही. तर मूलांक हा त्या त्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन ठरत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेची बेरीज करुन जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख १८ असेल तर त्याचा मूलांक ९ असतो.
अंकशास्त्रानुसार मूलांक २ ची मुले एखाद्या मुलीसाठी उत्तम पती सिद्ध होतात. २ या मूलांकाचा स्वामी ग्रह चंद्र असतो. त्यामुळेच या मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो. या मुलांकाची मुले अत्यंत हळवी आणि भावनिक असतात. या लोकांना नाती जपायला आवडतात. हे लोक कोणत्याही किंमतीवर कुटुंबाला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. शिवाय या लोकांना दगाबाजी करणे जमत नाही. त्यामुळेच हे लोक आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असतात.
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. जो या राशींवर प्रभाव टाकत असतो. त्याचप्रमाणे अंक शास्त्रात प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. आणि या ग्रहाच्या गुणधर्माचा प्रभाव मूलांकावर पडत असतो. त्यानुसार मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे. या ग्रहाच्या प्रभावाने मूलांक २ च्या लोकांचा स्वभाव शांत, शिस्तप्रिय आणि निडर असतो. हे लोक इतरांसोबत जुळवून घेण्यात उत्तम असतात. त्यामुळेच लोक यांच्याकडे आकर्षित होतात.
मूलांक २ च्या व्यक्तींना नात्यांचे महत्व माहिती असते. त्यामुळेच कोणतेही नाते या लोकांसाठी महत्वाचे असते. विशेष म्हणजे या मूलांकाचे लोक आपल्या विवाहाला अधिक महत्व देत असतात. त्यांच्यासाठी हे नाते फारच खास असते. हे लोक आपल्या पत्नीला सुखात ठेवण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी दाखवतात. ते नेहमीच पत्नीसोबत एकनिष्ठ असतात. या लोकांना आपल्या नात्यात गोडवा निर्माण करणे उत्तम जमते. त्यामुळेच या लोकांचे वैवाहिक आयुष्य अगदी सुखद असते.
संबंधित बातम्या