मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology: 'या' जन्म तारखेच्या मुली असतात सर्वात आकर्षित! पाहताच प्रेमात पडतात लोक

Numerology: 'या' जन्म तारखेच्या मुली असतात सर्वात आकर्षित! पाहताच प्रेमात पडतात लोक

Jun 01, 2024 10:43 AM IST

Numerology: अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकांचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मूलांकानुसार व्यक्तींचे स्वभावगुण आणि गुणदोष बदलत असतात.

'या' जन्म तारखेच्या मुली असतात सर्वात आकर्षित!
'या' जन्म तारखेच्या मुली असतात सर्वात आकर्षित!

Numerology: जोतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राच्या आधारे लोकांचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते. त्यामुळे या शास्त्राला विशेष महत्व आहे. राशीभविष्यात ज्याप्रकारे राशींवरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. अंकभविष्यात त्यासाठी मूलांकांचा आधार घेतला जातो. नावावरुन राशी ठरतात. तसेच जन्म तराखेवरुन प्रत्येक व्यक्तीचे मूलांक ठरते. या मूलांकांद्वारे एखाद्या व्यक्तीबद्दल रंजक गोष्टी जाणून घेता येतात. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकांचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मूलांकानुसार व्यक्तींचे स्वभावगुण आणि गुणदोष बदलत असतात. आज आपण अशा काही जन्म तारखेच्या मुलींबाबत जाणून घेणार आहोत, ज्या अत्यंत आकर्षित असतात. आणि पहिल्याच भेटीत लोक त्यांच्या प्रेमात पडतात.

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ या जन्म तारखेला जन्मलेल्या मुली दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक आणि हुशार असतात. अर्थातच या मुलींचा मूलांक ६ असतो. ६ या मूलांकाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे या मूलांकच्या लोकांवर शुक्र देवाची विशेष कृपा असते. शुक्र ग्रह धन, संपत्ती, सौंदर्य आणि कला यासाठी कारक असतात. शास्त्रानुसार, ज्या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपादृष्टी असते, ते लोक अतिशय सुंदर आणि धनवान असतात.

Lucky Zodiac Signs: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी या राशी ठरणार नशीबवान! पाहा आजच्या लकी राशी

मूलांक ६च्या मुली कशा असतात?

मूलांक ६ च्या मुली स्वभावाने तर सुंदर असतातच शिवाय त्यांना बाह्य सौंदर्यसुद्धा लाभलेलं असत. या मुली इतक्या आकर्षक असतात की पहिल्या भेटीतच लोक यांच्या प्रेमात पडतात. या मुली कोणत्याही परिस्थितीत आलिशान आयुष्य जगत असतात. त्यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. आणि कधी आर्थिक अडचणी आल्या तरी त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग लगेच सापडतो. देवी लक्ष्मीची सतत यांच्यावर कृपा असल्याने त्यांच्या हातात नेहमी पैसा असतो. आणि त्यामुळेच या मुली खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहात नाहीत. त्या नेहमीच दिलदार व्यक्तिमत्वाच्या असतात.

Dhanu makar kumbh meen: त्रिग्रही योगात धनु राशीच्या लोकांना प्रेमात होणार कुटुंबीयांचा विरोध! वाचा चारही राशींचे भविष्य

अत्यंत विश्वासू स्वभाव!

मूलांक ६ च्या मुली सुंदर आणि आकर्षित असण्यासोबतच हुशार आणि बुद्धिमानसुद्धा असतात. त्यांना आपल्या कार्यक्षेत्राची प्रचंड समज असते. सतत आपल्या कामामध्ये सुधारणा करुन प्रगती करण्याची जिद्द त्यांच्यात असते. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी त्यांचा चांगला नावलौकिक असतो. त्यांच्या याच कलागुणांमुळे वरिष्ठ नेहमीच त्यांच्यापासून प्रभावित होत असतात. खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर या मुलींना अतिशय समजूतदार आणि प्रेमळ जोडीदार मिळतो. त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत समृद्ध असते. या मुली अत्यंत विश्वासूसुद्धा असतात. त्यांना जोडीदाराशी दुहेरी वागणं जमत नाही. आणि म्हणूनच त्यांचे वैवाहिक आयुष्य भरभराटीचे असते.

WhatsApp channel
विभाग