अंकजोतिषला अंकभविष्य, अंकशास्त्र, अंकविद्या, संख्याशास्त्र अशा विविध नावांनी ओळखले जाते. राशीभविष्याप्रमाणेच अंकभविष्य तितकेच महत्वाचे आहे. अंकभविष्यात मूलांकावरुन एखाद्या व्यक्तीच्या भविष्यापासून ते स्वभावापर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला जातो. त्यामुळेच अंकभविष्यात मूलांकाला महत्व आहे. तुमच्या जन्म तारखेच्या आकड्यांच्या बेरजेवरून जो अंक मिळतो त्यालाच मूलांक असे म्हणतात.
अंकशास्त्रात १ ते ९ असे मूलांक असतात. या मुलांकांच्या आधारे तुमचे भविष्य सांगितले जाते. जोतिष शास्त्रानुसार तुमच्या जन्माच्या वेळी ग्रहाची जी स्थिती असते त्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ठरत असते. अंकभविष्यसुद्धा १ ते ९ मूलांकांच्या आधारे तुमच्या स्वभावाची गुणदोष सांगितले जातात. यामध्ये काही मूलांकांचे लोक अतिशय शांत,संयमी आणि समजूतदार असतात. मात्र काही मूलांकांचे लोक अतिशय तापट आणि रागीट स्वभावाचे असतात. पाहूया कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींमध्ये रागदोष असतो.
कोणत्या मूलांकांचे लोक असतात रागीट?शास्त्रानुसार, ९ या मूलांकाचे लोक अतिशय तापट आणि रागीट स्वभावाचे असतात. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ असणाऱ्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. अशात हे लोक प्रचंड रागीट स्वभावाचे असतात. या लोकांना एखाद्या गोष्टीत फारच लवकर राग येतो. त्यामुळे त्यांच्या जवळचे लोक सतत चिंतेत असतात. ९ मूलांकांच्या लोकांनां एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाल्याचे दिसल्यास त्यांची भयानक चिडचिड होते. हे लोक मनाने चांगले असले तरी रागीट वृत्तीमुळे लोकांची नाराजी ओढवुन घेत असतात. बऱ्याच वेळा काहीही न करतासुद्धा या लोकांशी जवळचे लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
मूलांक ९ असणाऱ्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ ग्रह उत्साह आणि ऊर्जा प्रसारित करणारा ग्रह म्हणूनही ओळखला जातो. हे लोक रागीट असण्यासोबत नशीबवानसुद्धा असतात. त्यामुळे कार्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात ये लोक अग्रेसर असतात. या लोकांना हातात घेतलेल्या प्रत्येक कामात मनासारखे यश मिळते. त्यामुळे त्यांची प्रगती वेगात होते. या लोकांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांना दबकून असतात.
मूलांक ९ चे लोक आपल्या आयुष्यात प्रचंड पैसा आणि संपत्ती कमावतात. या लोकांना विविध गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला आवडते. हे लोक कलात्मक प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे विविध कलात्मक गोष्टीमध्ये त्यांना अधिक रस असते. या लोकांना उच्च शिक्षण घेण्याचा योग असतो. शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा हे लोक अग्रेसर असतात. यांचा स्वभाव मल्टीटास्किंग असा असतो. या लोकांनां भरपूर पैसा कमावून लग्जरी आयुष्य जगायला आवडते.
मूलांक ९ असणाऱ्या लोकांचे वैवाहिक आयुष्य चढ उताराचे असते. या लोकांचे जोडीदारासोबत सतत खटके उडत असतात. यांच्या रागीट आणि तापट स्वभावामुळे जोडीदारासोबत सतत मतभेद पाहायला मिळतात. त्यामुळे अफाट पैसा आणि संपत्ती असूनदेखील यांचे वैवाहिक आयुष्य काहीसे निराशाजनक असल्याचे दिसून येते.