मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Jyotish : 'या' चमत्कारिक अंकाशी आहे तुमचाही संबंध? कोणत्याही क्षणी होऊ शकता मालामाल

Ank Jyotish : 'या' चमत्कारिक अंकाशी आहे तुमचाही संबंध? कोणत्याही क्षणी होऊ शकता मालामाल

Jun 19, 2024 03:15 PM IST

Ank Shastra About Mulank 1 : अंकभविष्यात मूलांकावरुन लोकांचे भविष्य, स्वभाव, गुणधर्म, करिअर अशा सर्व बाबींची माहिती करुन घेता येते.

अंकज्योतिष शास्त्र मूलांक १
अंकज्योतिष शास्त्र मूलांक १

अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकांचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. अंकशास्त्रात काही मूलांकाना अतिशय महत्वाचे स्थान आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की, मूलांक म्हणजे नेमके काय? तर एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हटले जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख १७ असेल तर त्याच्या बेरजेनुसार त्यांचा मूलांक ८ असतो. अंकशास्त्रात अशाप्रकारे १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात. या मूलांकावरुन लोकांचे भविष्य, स्वभाव, गुणधर्म, करिअर अशा सर्व बाबींची माहिती करुन घेता येते.

अंकभविष्यात खास महत्व असलेल्या मूलांकांमध्ये १ या मूलांकाचादेखील समावेश होतो. आज आपण मूलांक १ बाबत काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. १ या मूलांकावर सूर्याचा प्रभाव असतो. त्यामुळे या मूलांकांचे लोक अतिशय प्रभावी आणि आयुष्यात यशस्वी असतात. आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने हे लोक नेहमीच इतर लोकांच्यात उठून दिसतात.

अंकशास्त्रानुसार मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य तेज, संपत्ती, यश, नेतृत्व या सर्व गुणांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मूलांक १ च्या लोकांवर नेहमीच सूर्याची कृपादृष्टी असते. त्यामुळेच हे लोक इतरांपेक्षा अधिक प्रभावी आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असतात. या लोकांमध्ये प्रामाणिकपणा, स्वाभिमान, अतिशय महत्त्वाकांक्षी, आकर्षक, सुंदर असे विविध गुण असतात. इतकेच नव्हे तर सूर्यदेवाच्या कृपेने या लोकांना आरोग्यविषयक समस्या फारच कमी असतात. त्यामुळे हे लोक सतत आनंदी आणि उत्साही राहतात.

विशेष म्हणजे मूलांक १ च्या लोकांमध्ये अप्रतिम निर्णय क्षमता असते. कोणत्याही गोष्टीबाबत निर्णय घेताना हे लोक चहुबाजुंनी विचार करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय नेहमीच योग्य ठरतात. या निर्णय क्षमतेच्या जोरावर ते यश खेचून आणतात. त्यामुळेच या मूलांकाच्या लोकांचे भाग्य कोणत्याही क्षणी उघडू शकते. या लोकांना आयुष्यात नेहमीच सुख प्राप्त होते. शिवाय मूलांक १ चे लोक कोणत्याही कार्यात इतरांवर अवलंबून राहणे पसंत करत नाहीत. आणि म्हणूनच त्यांना स्वतःवर आत्मविश्वास असतो.

मूलांक १ च्या लोकांची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असते. यांना बुद्धी चातुर्याने नोकरी-उद्योग-व्यवसायात नेहमीच यश लाभते. त्यामुळे त्यांना वारंवार धनलाभ होत असतो. हातात पुरेसा पैसा असल्याने हे लोक खर्चही मनमोकळ्यापणाने करतात. या लोकांचे विचार फारच सकारात्मक असतात. हे लोककोणत्याही अडचणीत सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन त्यावर मात करतात. त्यामुळेच मूलांक १ चे लोक आयुष्यात यशस्वी आणि श्रीमंत बनतात.

WhatsApp channel