Nostradamus New Year 2025 Prediction In Marathi : वर्ष २०२४ संपायला अवघे २१ दिवस शिल्लक आहेत. ज्यांचे वर्ष कठीण गेले आहे ते २०२५ ची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर ज्यांच्यासाठी २०२४ फायदेशीर ठरले, त्यांना पुढील वर्षही चांगले जावे अशी अपेक्षा आहे. मात्र शतकांपूर्वी जगाचा निरोप घेणाऱ्या फ्रेंच ज्योतिषी नास्त्रेदमस यांनी २०२५ बाबत अनेक धक्कादायक भाकिते केली आहेत. जाणून घेऊया सविस्तर.
नास्त्रेदमस हा एक फ्रान्स भविष्यावेत्ता होता. १४ डिसेंबर १५०३ मध्ये फ्रान्स मधील रोमी येथे त्याचा जन्म झाला. तो एक तज्ज्ञ जोतिष होता, याच विद्येच्या जोरावर त्याने अनेक भविष्यवाणी केल्या. त्यांच्या भविष्यवाणी ह्या खऱ्या ठरल्या आहेत. त्याने स्वत:च्या मृत्युनंतर त्याची कबर २२५ वर्षानंतर खोदली जाईल अशी भविष्यवाणी केली होती जी १७९१ मध्ये खरी ठरली. त्याने भारताविषयी सुद्धा काही भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या तंतोतंत खऱ्या ठरल्या.
नास्त्रेदमसने १५५५ मध्ये एक पुस्तक लिहिले. सर्व भविष्यवाण्या या पुस्तकात लिहिल्या आहेत. पुस्तकावर संशोधन करणाऱ्या लोकांनी २०२५ शी संबंधित काही संकेत जगासमोर मांडले आहेत. यामध्ये, पृथ्वीवर आदळणाऱ्या लघुग्रहापासून ते प्लेगसारख्या साथीच्या रोगाचा समावेश आहे.
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार, २०२५ मध्ये दीर्घकाळ चाललेल्या युद्धाचा अंत होऊ शकतो. हे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित आहे.
नास्त्रेदमसने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, दीर्घकाळ चालणारे युद्ध दोन्ही बाजूंच्या सैन्याला थकवून टाकेल. सैन्याला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही शिल्लक राहणार नाहीत. तर आणखी एका भविष्यवाणीनुसार फ्रान्स आणि तुर्की यांच्यात वाद होईल असे सांगितले जात आहे.
नास्त्रेदमसने भाकीत केले आहे की, २०२५ ची सुरुवात भयंकर युद्धाने होईल किंवा इंग्लंडमध्ये प्लेगसारख्या धोकादायक महामारीने होईल. नास्त्रेदमसने याचे वर्णन शत्रूंपेक्षाही अधिक धोकादायक असे केले आहे. नास्त्रेदमसने २०१९ साठी अशीच भविष्यवाणी केली होती, त्यानंतर जगाला कोविड -१९ चा सामना करावा लागला.
संकट केवळ पृथ्वीवरच नाही तर अवकाशातूनही येणार आहे. २०२५ मध्ये एक मोठा लघुग्रह पृथ्वीला धडकेल किंवा पृथ्वीच्या अगदी जवळ येईल, अशी भविष्यवाणीही नास्त्रेदमसने केली आहे. तसेच, सध्या पृथ्वीच्या दिशेने लघुग्रहाचे आगमन ही नवीन गोष्ट नाही. अशा अनेक बातम्या तुम्ही दरवर्षी वाचत असाल. असे लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतात आणि सुरक्षित अंतरावर संपतात.
नास्त्रेदमसने असेही लिहिले आहे की, जगाची बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील देशातील पर्वत पेटतील. लोकांना विषारी गंधकयुक्त पाणी प्यावे लागेल.
या भविष्यवाणीचा विचार करता या सर्व घटना खऱ्या ठरतील की नाही हे सांगता येणं अशक्य आहे. परंतू अशा भविष्यवाणीमुळे लोकांमध्ये भिती पसरली आहे.
संबंधित बातम्या