Navin Varsha 2025 In Marathi : नवीन वर्षाचा पहिला दिवस हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला येत आहे. उत्तराषाढा नक्षत्रात असल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. व्याघात आणि हर्षण योगात भाविक १ जानेवारी साजरी करतील. हे योग अत्यंत शुभ मानले जातात आणि सर्व राशींसाठी खूप खास असतील. हे योग सर्व राशींना चांगले परिणाम देतील.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही खास उपाय करून नवीन वर्ष खास बनवू शकता. या उपायाने केवळ समस्याच दूर होत नाहीत तर घरात सुख-समृद्धी वाढते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टी कराव्या, जाणून घेऊया नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे.
ज्योतिषांच्या मते हे नक्षत्र आणि योग शुभ असल्याने हे वर्ष शुभ राहील. नव्या वर्षात आणखी एक खास गोष्ट असणार आहे. हे वर्ष बुधवारपासून सुरू होऊन बुधवारी संपणार आहे. हे वर्ष सर्व राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. या वर्षात प्रत्येकाला पुढे जाण्याची आणि यश व प्रगती साधण्याची पुरेशी संधी आहे.
नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या उपासनेने करणे श्रेयस्कर ठरेल, असे ज्योतिषी सांगतात. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. मंदिरात जाण्याबरोबरच दानधर्म केल्याने नवीन वर्षात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. मंदिराव्यतिरिक्त घरातच हवन वगैरे करणे अत्यंत शुभ ठरेल. ज्योतिषींच्या मते, नवीन वर्षात अनेक ग्रहांच्या राशीबदलाचा ही लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. जानेवारी महिन्यात सूर्य आणि शुक्र सारखे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत.
गायत्री मंत्र, महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते. तसेच घराच्या उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा यामुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते. तुमच्या देवघरात शंख नसल्यास आजच देवघरात शंख घेऊन या, जिथे शंख असतो तिथे लक्ष्मीचा सदैव वास राहतो. घराच्या मुख्य दरवाजाजवळ मोर पंख लावा यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा राहील. वास्तूनुसार आजच एक छोटे नारळ एका लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही. धातुचा कासव सुख-समृद्धीचे प्रतीक आहे, हा कासव तांबे किंवा चांदीचा असावा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही खरेदी करायची असेल तर हा कासव नक्की आपल्या घरी घेऊन या.
संबंधित बातम्या