नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? आणि ९ हा अंक इतका विशेष का, याविषयी जाणून घ्या.
यंदा नवरात्र ३ ते १२ ऑक्टोबर पर्यंत आहे. नवरात्र हे दिवसांवर नाही, तर तिथीवर आधारलेले आहे. प्रतिपदेपासून ते नवमी या तिथीपर्यंत हा उत्सव असतो. तसेच, दहाव्या दिवशी दसरा सण साजरा करून नवरोत्थापन केले जाते. अनेकदा तिथीची वृद्धी होते किंवा क्षय होतो. त्यामुळे कधी हा उत्सव १० दिवसांचा, तर कधी आठ दिवसांचा असू शकतो.
या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते आणि उपवास केला जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. भारतीय संस्कृतीत 'नऊ' या अंकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यात नऊ या अंकाला विशेष दर्जा देण्यात आला आहे. माणसाच्या जडणघडणीत नऊ हा अंक खूप प्रभाव पाडत असतो.
नवरात्र हा नऊ रात्रींचा उत्सव आहे. त्यामुळे हिंदू धर्मात 'नवरात्र' या सणाला विशेष महत्व देण्यात आले आहे. नवरात्र' हा एक शब्द दोन शब्दांनी मिळून बनवण्यात आला आहे. पहिला शब्द आहे 'नऊ' आणि दुसरा शब्द आहे 'रात्र'.
नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा केली जाते. कारण- त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक यांचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर नऊ दिवसांत ते अंकुरते.
गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ दिवस लागतात. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे. म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते.
भौतिक ऊर्जादेखील नऊ आहेत. धर्मग्रंथानुसार, सृष्टीत असणारी भौतिक ऊर्जादेखील नऊ प्रकारांत मोडली आहे. यातील नववा प्रकार ग्रह-नक्षत्राचा आहे.
ज्योतिष शास्त्रात नवग्रहांणा मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक ग्रह आणि दुर्गा देवीचा खास संबंध आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची संख्यादेखील नऊ आहे.
जैविक सृष्टी आणि पृथ्वीचे स्वरुपदेखील नऊ प्रकारचं आहे. स्त्रीचे गुण, स्वभावदेखील नऊ आहेत. तसेच मानवाच्या मनाचे भावदेखील नऊ आहेत. माणसाच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या संख्यांमध्ये नऊ अंकाला विशेष महत्त्व आहे.
संबंधित बातम्या