सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जाईल. शनि हर्शल वक्री होत आहेत. त्याच बरोबर बुध, रवि, शुक्र या ग्रहांच्या राशी परिवर्तनात 'या' राशींना आकस्मिक धनलाभ होणार! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी!
[ वृषभ, कन्या, वृश्चिक, कुंभ ]
महिन्यात शुक्र-बुध- रवि-मंगळाच्या राशी संक्रमणात आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. कुटुंबा मधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. दुरवरचे प्रवास आनंद दायक होतील.
विशेष शुभ तारिखः ०५,०७,१०,१३,१७,२४,२६.
महिन्यात शुभ फलदायक ग्रहांचा युतीयोग पाहता कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग पक्का आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. या महिन्यात आपल्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल.सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील. मौल्यवान वस्तुंचा संग्रह कराल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावणारा महिना आहे.
विशेष शुभ तारिखः ०७,०९,१३,१५,१९,२२.
महिन्यात ग्रहांची अनुकूलता लाभल्याने आपला आत्मविश्र्वास द्विगुणित होईल. आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकाल. आर्थिक उत्कर्ष होईल. परंतु आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल. आपणास एखादी मोठी जमीन किंवा स्थावर मिळू शकेल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. कर्तृत्वाला उजाळा देणारा महिना असणार आहे. महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदला बरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा अंशतः वाढणार आहे. स्वतंत्र व्यवसाय ग्रहसंकेत उत्तम आहेत. नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. आर्थिक आवक वाढणार आहे. स्थावर यात गुंतवणूक करताना सल्ला घ्यावा. उच्चशिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. लेखकवर्ग संपादन कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल. आपणास नशिबाची साथ मिळेल. आपली कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल. आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल व त्यामुळे आपला उत्साह वाढून आपल्या जीवनात नावीन्य निर्माण होईल.
विशेष शुभ तारिखः ०२,०५,०९,१४,१८,२२,२५.
महिन्यात स्वराशीतील शनीचा इतर ग्रहांशी संयोग होत असुन रोजगारात नवीन पद्धतींचा वापर केल्यास उत्तम यश संपादन करा. नोकरीत आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रगती साधाल. नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आर्थिक गुंतवणूक लाभ देईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरात काही शुभ घटना घडू शकतात. नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल. मनोवृत्ती आनंदी राहिल. व्यापारात उत्कृष्ठ प्रगती कराल. राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्रप्ती व मानसन्मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणी ऊर्जादायक राहणारआहे. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. शेअर मार्केट मध्ये अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा. यश निश्चित लाभेल. मन आनंदी राहिल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल. उत्कर्षकारक कालावधी राहील. परदेशातील प्रवासातुन लाभ होईल. गतकाळातील कार्यातून तुम्हाला लाभ मिळू शकतो. आपणास सरकारकडून सुद्धा काही लाभ मिळण्याची संभावना आहे.
विशेष शुभ तारिखः ०८,१०,१२,१६,२२,२५.