ऑक्टोबर महिन्यात रवि, बुध, शुक्र, मंगळ हे चार ग्रह राशीबदल करीत असुन देव बृहस्पति गुरू वक्री होत आहेत. तसेच अस्त बुध उदीत होणार असून या राशींना होणारं फायदा ! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी!
[ मिथुन, कन्या, वृश्चिक, कुंभ ]
महिन्यातील पाहता मनोधैर्य वाढेल. रोजगारात विशेष यश येईल. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उताविळपणा करु नका. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया. समाजात कुटुंबात आपल्या कार्याचे कौतुक होईल. आपला आहार वेळेवर घ्या. कौटुंबिक वातावरण व आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने आनंदी रहाल. वडिलोपार्जित इस्टेट वास्तू याविषयी कामे पार पडतील. नवीन घर खरेदीचा योग आहे. आपल्या वस्तुची देखभाल कराल. नोकरीत इच्छेप्रमाणे बदली किंवा बढ़ती मिळण्याचे योग आहेत. मित्र सहकारी यांची मदत मिळेल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. सामजिक प्रसिद्धि मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. गीतकार व गायक वादक यांना संधी मिळेल. कलाक्षेत्रातील लोकांची लोकप्रियता वाढीस लागेल.
विशेष शुभ तारीखः ०४,०५,०९,११,१९,२२,२६,२९.
महिन्यात चार ग्रहांचं राशीपरिवर्तन योग पाहता आपणास आकस्मिक धनलाभाचे योग तर आहेतचं त्याचबरोबर समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.सप्ताहात गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. दिनमान उत्साहवर्धक राहील. परदेशगमनाचे योग आहेत. विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. मनाला समाधान लाभेल.
विशेष शुभ तारीखः ०६,०८,१३,१९,२४,२७.
महिन्यात ग्रहांच्या योगामुळे शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. गुरूबल पाहता गुरूकृपा लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. शासकिय क्षेत्रात व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी असेल. सप्ताहात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. ह्या शुभ योगात लाभ घ्या. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहिल. आपले आरोग्य मानसिक समाधान उत्तम राहणार आहे. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल.
विशेष शुभ तारीखः ०५,१०,१६,१९,२३,२४,२९.
महिन्यातील ग्रहयोग पाहता आपल्या कला गुणांना प्रसिद्धी मिळेल. सन्मानाचे सुद्धा योग आहेत. पत्नीचा जोडीदाराचा उत्कर्ष होईल. कौटुंबिक बाबतीत आनंदही उपभोगाल. नव्या संधी प्राप्त होतील. मनाप्रमाणे कामे करता येतील. सामाजीक व्यक्तींना पद मानसन्मान वाढेल. भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडा कडून मोठं सहकार्य मिळणारआहे. मनाजोग्या घटना घडतील. घरात धार्मिक कार्य मंगलकार्य होईल. घरात आनंदाच प्रसन्न वातावरण राहिल. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. संतती कडून सुख समाधान लाभेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. मागील कामात विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढती मिळेल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यां कडून स्नेह प्राप्त होईल.व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. अत्यंत शुभ फलदायी घटना घडणार आहेत.
विशेष शुभ तारीखः ११,१३,१७,२३,२६,२७,३०.