Monthly lucky zodiac signs : मार्च या ४ राशींसाठी भरभराटीचा, ग्रह-नक्षत्राच्या बदलात होईल रोजगारात वृद्धी-monthly lucky zodiac signs march 2024 vrishabh tula dhanu meen rashi predictions ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Monthly lucky zodiac signs : मार्च या ४ राशींसाठी भरभराटीचा, ग्रह-नक्षत्राच्या बदलात होईल रोजगारात वृद्धी

Monthly lucky zodiac signs : मार्च या ४ राशींसाठी भरभराटीचा, ग्रह-नक्षत्राच्या बदलात होईल रोजगारात वृद्धी

Mar 02, 2024 09:53 AM IST

monthly Lucky Rashi february 2024 : मार्च महिना सुरु झाला आहे. हा महिना ४ राशींसाठी रोजगारात वृद्धचा व आर्थिक भरभराटीचा राहील, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

Monthly lucky zodiac signs march 2024
Monthly lucky zodiac signs march 2024

मार्च महिन्यात मंगळ शुक्र रवि याचं राशीपरिवर्तन आणि अस्त बुध शनिचा उदय 'या' राशींसाठी अनुकूल राहील! रोजगारात वृद्धी आणि आर्थिक भरभराट होणार! कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी !

वृषभः 

महिन्यात मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. मनोबल कमालीचे उंचावलेल असेल. व्यवसाय कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनशांती लाभेल. वाहन घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल.

विशेष शुभ तारिखः ३,५,७,९,१२,१८,२१,२४,२६.

तूळ: 

महिन्यात आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. बुध प्रभाव आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विवाह इच्छुकांचे खात्रीशीर विवाहाचे योग आहेत.विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व पुस्तक ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासा तुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नवीन आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल.

विशेष शुभ तारिखः ३,५,७,९,१२,१८,२१,२४.

धनुः 

महिना आनंददायी असणार आहे. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबा तील स्थिती चांगली राहिल. आपल्या इच्छित महत्व कांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थ्यी विद्याभ्यासात प्रगती करतील. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर, वाहन खरेदीस अनुकूल वातावरण आहे. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संतती कडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

विशेष शुभ तारिखः ३,५,७,९,१२,१८,२१,२४,३०.

मीनः 

महिन्यात अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आपल्या कार्य क्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी सप्ताह आहे. मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा कालावधी आहे. आनंदी व ऊत्साही सप्ताह राहील. मनात प्रसन्नता असेल. आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.

विशेष शुभ तारिखः ३,५,७,९,१२,१८,२१,२४,२६.२८.

Whats_app_banner