Monthly Lucky Zodiac Signs : या ४ राशींसाठी ऑगस्ट महिना प्रसिद्धीचा, कामात यश मिळेल! वाचा मासिक लकी राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Monthly Lucky Zodiac Signs : या ४ राशींसाठी ऑगस्ट महिना प्रसिद्धीचा, कामात यश मिळेल! वाचा मासिक लकी राशीभविष्य

Monthly Lucky Zodiac Signs : या ४ राशींसाठी ऑगस्ट महिना प्रसिद्धीचा, कामात यश मिळेल! वाचा मासिक लकी राशीभविष्य

Aug 01, 2024 07:49 AM IST

Monthly Lucky Rashi August 2024 : जुलै महिना संपला असून, ऑगस्ट महिना प्रारंभ झाला आहे. हा महिना ४ राशींसाठी लाभदायक राहील, जाणून घ्या कोणासाठी महिना लकी सिद्ध होईल.

मासिक लकी भविष्य, नशीबवान राशीभविष्य ऑगस्ट २०२४
मासिक लकी भविष्य, नशीबवान राशीभविष्य ऑगस्ट २०२४

ऑगस्ट महिन्यात रवि, बुध, शुक्र, मंगळ हे निर्णायक ठरणारे चार या ग्रह राशीबदल करणार आहेत. कसा असेल हा महिना! या अध्यात्मिक दृष्टीकोनातून महत्व असणाऱ्या श्रावण महिन्यात या राशींची होणार आर्थिक आणि भौतिक प्रगती!

[ वृषभ, कर्क, धनु, कुंभ ]

वृषभः 

महिन्यात शुभ फलदायक शुक्र मंगळ नवमपंचम योग पाहता आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग पक्का आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. या महिन्यात आपल्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील. मौल्यवान वस्तुंचा संग्रह कराल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावणारा महिना आहे.

विशेष शुभ तारिखः ३,५,७,९,१२,१८,२१,२४

कर्कः 

महिन्यात गुरू राहु हर्शल ग्रहयुती आणि रवि शुक्र बुध ग्रहाचं राशी परिवर्तन आपणास अचानक धन लाभाची संधी मिळणार आहे. अपेक्षीत संपत्ती खरेदी अचानक होईल. काही बाबतीत विशेष अनुकुल अश्या घटना घडतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. हुदद्दा अधिकार व सरकारी नोकरी यापासुन लाभ होतील. कलेची आवड निर्माण होईल. व्यवसाया निमीत्त परदेश गमनाचे योग येतील. आपले इष्ट सिध्दीस जातील. आपले मनोबल उत्तम राहील. मीडिया क्षेत्र कला क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची साथ लाभणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढेल. शत्रुवर विजय मिळवाल. चागंले मित्र मिळतील. अनेक इच्छा पुर्ण होतील. तरूण तरूणीचे विवाहाचे योग आहेत. नवीन घर खरेदीचे योग पण आहेत. आपल्या कर्तबदारीमुळे किर्ती मिळेल. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. नवीन प्रकल्प आरंभ करण्यास उत्तम महिना आहे.

विशेष शुभ तारिखः ५,८,१५,२७,२९, ३०.

धनुः 

महिन्यात रवि बुध युती आणि सकल ग्रहयोग पाहता प्रगतीदायक यश आणि अनुकूल वातावरण निर्माण करणारा महिना आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरुर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. व्यवसायिक समाधानी असतील. मित्र मैत्रिणीच्या सहकार्यामुळे आपण यशाच्या अगदी जवळ जाल. सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे. त्यांना बहुमान मिळण्याची संभावना आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल. जमिन खरेदीतून लाभ होईल. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळणार आहे. आर्थिक येणी वसुल होतील. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. अचानक धनलाभ घरामध्ये समारंभाचे नियोजन कराल. अध्यात्मिक आणि आत्मिक समाधान लाभेल. शास्त्रीय अभ्यास संशोधनपर कार्याच्या दृष्टीकोनातून उत्तम महिना आहे.

विशेष शुभ तारिखः ७,८,१२,१५,१६,२१,२४.

कुंभः 

महिन्यात मंगळ शुक्र यांची व्ययातील लक्ष्मी दायक युतीत आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. कुटुंबा मधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. दुरवरचे प्रवास आनंददायक होतील.

विशेष शुभ तारिखः ९,१०,१६,१८,२०,२२,२४.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner