मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Monthly Horoscope June 2023 : जून महिन्यात ग्रहराशी परिवर्तनामुळे काय होणार शुभाअशुभ परिणाम, वाचा राशीभविष्य

Monthly Horoscope June 2023 : जून महिन्यात ग्रहराशी परिवर्तनामुळे काय होणार शुभाअशुभ परिणाम, वाचा राशीभविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Jun 01, 2023 01:36 PM IST

Monthly Horoscope June 2023 : जून महिन्यात व्यापारवृद्धीकारक बुध, प्रसिद्धीचा दाता रवि आणि पराक्रमी मंगळ अनुक्रमे वृषभ, मिथुन, सिंह या राशीत राशीप्रवेश करत आहेत. त्याचे काय परिणाम होऊ शकतात, वाचा!

Monthly Horoscope
Monthly Horoscope

जूनमधील शुभाअशुभ दिवस

उत्तम दिवसः २,५,७,१०,१६,२४,२९.

चांगला दिवसः १०,१४,१७,२२,२६,२८.

अनिष्ट दिवसः१,४,६,९,१२,१४,१९,२३,२९,३०.

मेष : महिन्यात सुरुवातीचे चंद्रभ्रमण आपणास मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवा. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन-घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंदायक राहील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम कालखंड आहे. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. आर्थिक प्रगती राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य नातेवाईकाकडून फसवणूक होईल. भागीदारासोबत वादविवाद टाळा.

चंद्रबलः १,२,४,७,८,१२,१५,१६,२७,२८

वृषभ : महिन्यात सुरुवातीचे चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग पाहता अचानक धनलाभाची संधी मिळेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले बरे. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृतिकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपासनेमध्ये खंड पाडेल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रयत्नांदी परमेश्वर याचा काहीसा अनुभव आपणास येईल. महत्वाच्या कामासाठी भाग्य आपणाबरोबर असावे लागते याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेणार आहात. मध्यान्न काळानंतर वडिलार्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे.आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे. अपचन पित्त,या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये. आपणाला अपेक्षित असणाऱ्या घटना घडतील. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भीती आपणास वाटेल. मानसिक यातनांना आपणास तोंड द्यावे लगेल. जेष्ठांचा सल्ला आपणास बहुमोल ठरेल. अवास्तव खर्च टाळणे जरुरीचे आहे.

चंद्रबलः २,३,५,६,९,१०,१२,१५,२१,२४,२८.

मिथुन : महिन्यात प्रारंभी चंद्रभ्रमण आणि पाहता त्रासदायक कालावधी आहे. वाहन प्रवास आपणास करण्यास आवडत असला तरी थोडासा आवर घालावा लागणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढते ठेवणारा आहे. तेव्हा खर्च जपूनच करावा लागणारआहे. प्रॉपर्टी विक्री पासून नुकसान होण्याची संभावना आहे. शेअर्स अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही सध्या प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणुकीची संभावना आहे. कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल. महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे. शासकीय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ प्रतिकूल आहे. आपणास अतिशय प्रिय असणारा प्रवास हा दूरचा होणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचार टाळावेत. सामाजिक प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. व्यवसायिकांना भागिदारीत सामजस्यपणाची भुमिकेतून वाटचाल करावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी वाढविणारे आहे. कार्यक्रमांमध्ये वस्तूंची जपणूक करणे गरजेचे आहे.मित्र मैत्रिणीं सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता उत्साहाने अभ्यास करावा लागणार आहे. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळल्या पाहिजेत. घरातील वातावरण एकंदरीत ताणतणावाचे असल्यामुळे आपली आर्थिक स्थिती चिंतादायक असेन. कर्ज काढताना निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. कामगारांवर न विसंबून राहणे योग्य होईल. गैरसमजातून आपल्या मानसिक त्रास जाणवेल. संततीची प्रकृति जपणे गरजेचे आहे.

चंद्रबलः ४,५,६,७,८,२४,२५,२६ २८.

कर्क : महिन्याच्या सुरुवातीचे चंद्रभ्रमण पाहता आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत.आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडूनआपणास आर्थिक आवक मिळेल.पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोरपणा वाढू देवू नये.कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर मर्जी ठेवणार आहे. इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. महिलांना काळ अनुकूल आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावे. वाहन घर खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. प्रेमी युगुलांनी टोकाची भूमिका घेण्यापर्यंत वादविवाद टाळावे. मित्र मैत्रिणींचे सहकार्य लाभेल.आरोग्य उत्तम राहील.

चंद्रबलः१,८,९,१०,१४,१५,२२,२४,२८.

सिंह : महिन्यात चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग प्रगतीशील राहतील. खेळाडूंसाठी काळ यशदायक आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करून घेतच आहात, त्याचबरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. विवाह इच्छुकांचे विवाहयोग उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबर प्रसिद्धीही मिळेल. घर वडिलर्जित प्रॉपर्टीच्या वादासंबंधी योग्य व्यक्तींकडून सल्ला घेणे उचित ठरेल.

चंद्रबलः १,३,५,७,९,१०,१६,२२,२६,२८.

कन्या : महिन्यात ग्रहयोग पाहता सुरुवातीस अचानक धनलाभाची संधी मिळेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले बरे. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपासने मध्ये खंड पाडेल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रयत्नांदी परमेश्वर याचा काहीसा अनुभव आपणास येईल. महत्वाच्या कामासाठी भाग्य आपणा बरोबर असावे लागते याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेणार आहात. मध्यान्न काळानंतर वडिलार्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे. आर्थिक प्रगति करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे. आपणाला अपेक्षीत असणाऱ्या घटना घडतील. व्यावसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरून मानसिक भीती आपणास वाटेल. मानसिक यातनांना आपणास तोंड द्यावे लगेल. जेष्ठांचा सल्ला आपणास बहुमोल ठरेल. अवास्तव खर्च टाळणे जरुरीचे आहे.

चंद्रबलः २,३,५,६,९,१०,१२,१५,२१,२४,२८.

तुला : महिन्याच्या सुरुवातीस आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल.आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षे प्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल.आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोर पणा वाढू देवू नये. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे. इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. महिलांना काळ अनुकूल आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावे. वाहन घर खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. प्रेमी युगुलांनी टोकाची भूमिका घेण्यापर्यंत वादविवाद टाळावे. आपल्याला बहुमाना बरोबर प्रसिद्धीही मिळेल. वडिलर्जित प्रॉपर्टीच्या वादासंबंधी योग्य व्यक्तींकडून सल्ला घेणे उचित ठरेल.

चंद्रबलः१,८,९,१०,१४,१५,२२,२४,२८.

वृश्चिक : महिन्यात व्यापारात भागीदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखकवर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे.आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर,वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाच्या ऑफर इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. शेअर्स खरेदी तूर्तास लांबणीवर ठेवलेली योग्य राहील. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.

चंद्रबलः २,३,६,८,१०,२२,२४,२८.

धनु : महिन्यात ग्रहमान प्रगतीशील राहाल. कलाकारा साठी काळ यशदायक आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करुन घेतच आहात त्याच बरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल.विवाह इच्छुकांचे विवाहयोग उत्तम आहे.आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल.घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे.

चंद्रबलः २,४,६,८,१०,१३,१५,१७,२२,२७,२९.

मकर : महिन्यातील चंद्रभ्रमण पाहता रोजगारात नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. स्वभावात रागीटपणा निर्माण होईल. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतील. व्यापारात अपयश येण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. आहारावर नियंत्रण ठेवा. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. चिडचिडेपणा वाढणार आहे. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. कामात इतरांचे सहकार्य लाभणार नाही. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. मोठमोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील. काहीसा ताणतणाव पूर्ण स्थिती निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषत: मानसिक स्वास्थ संभाळा. प्रेमप्रकरणात वितृष्ट निर्माण होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर इतर सदस्यांबरोबर वादविवाद टाळावे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. भपकेबाजपणा व डामडौलपणा टाळा. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल.

चंद्रबलः १,४,६,८ १०,१४ १६,१८ १९ २२ २४,२७.

कुंभ : महिन्यात ग्रहयोग प्रगतीशील राहतील. कलाक्षेत्र आणि लेखकवर्गासाठी काळ यशदायक आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करुन घेतच आहात त्याच बरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. विवाह इच्छुकांचे विवाहयोग उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकरवर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबर प्रसिद्धीही मिळेल.

चंद्रबलः १,३,५,८,२३,२४,२७,२९.

मीन : महिन्यात ग्रहयोग पाहता व्यापारात भागीदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखक वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग दुग्धशर्करा आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहयोग आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षित शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. शेअर्स खरेदी तूर्तास लांबणीवर ठेवलेली योग्य राहील. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

चंद्रबलः २,४,५,७,१०,११,१४,१९,२६,२८.

 

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel