Surya Ardra Nakshatra: सूर्यदेवाच्या कृपेने होणार मुसळधार पाऊस! तुम्हाला माहितेय का पावसाचे नक्षत्र कोणते?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Ardra Nakshatra: सूर्यदेवाच्या कृपेने होणार मुसळधार पाऊस! तुम्हाला माहितेय का पावसाचे नक्षत्र कोणते?

Surya Ardra Nakshatra: सूर्यदेवाच्या कृपेने होणार मुसळधार पाऊस! तुम्हाला माहितेय का पावसाचे नक्षत्र कोणते?

Jun 22, 2024 02:41 PM IST

Monsoon 2024 : गेल्या काही दिवसांपासून मृगशीर नक्षत्रात असलेल्या सूर्यदेवाने आता नक्षत्र परिवर्तन करत आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे. जाणून घ्या सूर्यदेवाचे नक्षत्र

सूर्याचे आर्द्रा नक्षत्र प्रवेश, मुसळधार पाऊस
सूर्याचे आर्द्रा नक्षत्र प्रवेश, मुसळधार पाऊस

ज्योतिषशास्त्रात ग्रह राशींप्रमाणेच नक्षत्र परिवर्तनसुद्धा करत असतात. गेल्या काही दिवसांपासून मृगशीर नक्षत्रात असलेले सूर्यदेव आता नक्षत्र परिवर्तन करत आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. आज २२ जून २०२४ रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात विराजमान होणार आहे. शास्त्रानुसार सूर्य दर १५ दिवसांनी नक्षत्र बदलत असते. त्यामुळेच पुढच्या १५ दिवसांपर्यंत नक्षत्र आर्द्रा नक्षत्रात विराजमान असणार आहे. या १५ दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आर्द्रा नक्षत्र हे पावसाच्या नक्षत्रांपैकी एक आहे. त्यामुळेच सूर्यदेव या नक्षत्रात येताच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.

वैदिक शास्त्रानुसार ग्रहांचे नक्षत्र परिवर्तनसुद्धा एका ठराविक काळात होत असते. त्यानुसार सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा कालावधीसुद्धा निश्चित आहे. सूर्य १५ दिवसांनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतो. पंधरा दिवसांपूर्वी सूर्याने मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला होता. आता १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सूर्य मृगशिरा नक्षत्रातून निघून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. शास्त्रानुसार आर्द्रा नक्षत्र हे जलचर नक्षत्र आहे. त्यामुळेच सूर्यदेव आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करताच मुसळधार पावसाला सुरुवात होते. येत्या १५ दिवसांपर्यंत पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शिवाय यंदा आर्द्रा नक्षत्रात स्त्री-पुरुष योग जुळून येत आहे. या योगामुळे चांगला पाऊस पडतो. मात्र गेल्यावर्षी आर्द्रा नक्षत्रात स्त्री-स्त्री योग बनला होता. त्यामुळे गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी होते.

पावसाचे नक्षत्र कोणते?

आर्द्रा नक्षत्र

पावसाच्या नक्षत्रांपैकी एक आर्द्रा नक्षत्र होय. २२ जून २०२४ रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात विराजमान होणार आहे. येत्या ६ जुलैपर्यंत सूर्य आर्द्रा नक्षत्रातच राहील. या १५ दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

पुनर्वसू नक्षत्र

आर्द्रा नक्षत्रानंतर सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २० जुलैपर्यंत सूर्य या नक्षत्रात असेल. मात्र या नक्षत्रात स्त्री-स्त्री योग बनत असल्याने पावसाचा वेग मंदावलेला दिसेल.

पुष्य नक्षत्र

पुनर्वसू नक्षत्रातून सूर्य पुष्य नक्षत्रात विराजमान होणार आहे. २० जुलैपासून ५ ऑगस्ट पर्यंत सूर्य या नक्षत्रात असणार आहे. या नक्षत्रात स्त्री-पुरुष योग निर्माण होत असल्याने, पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

आश्लेषा नक्षत्र

५ ऑगस्टला सूर्य पुष्य नक्षत्र सोडून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २० ऑगस्टपर्यंत सूर्य याच नक्षत्रात असणार आहे.

मघा नक्षत्र

२० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सूर्य मघा नक्षत्रात विराजमान असणार आहे. मघा नक्षत्रात जोरदार पाऊस होण्याचा योग आहे.

पूर्वा फाल्गुनी नक्षत्र

५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात राहणार आहे.

उत्तरा नक्षत्र

२० सप्टेंबर ५ आक्टोबर या काळात सूर्य उत्तरा नक्षत्रात असणार आहे.

हस्त नक्षत्र

मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. याकाळात पावसाची पाठवणी होते. या नक्षत्रात पाऊस येईपर्यंत पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला असतो.

Whats_app_banner