Remedies On Mokshada Ekadashi According to Rashi : यावर्षी मोक्षदा एकादशीचे व्रत डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. मोक्षदा एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी पूर्ण मनोभावे भगवान श्री विष्णूची पूजा केल्याने जीवनातील बहुतांश समस्या दूर होतात. असे मानले जाते की या दिवशी काही उपाय केल्याने श्री हरीचा आशीर्वाद मिळण्याबरोबरच सुख-समृद्धीमध्येही वाढ होते. ११ डिसेंबरला तुमच्या राशीनुसार मोक्षदा एकादशीला करा हे उपाय-
मेष - मेष राशीच्या लोकांनी भगवान श्री विष्णूला गंगा जलाने अभिषेक करावा आणि त्यांना पिवळे चंदन लावावे.
वृषभ - भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी ॐ नमो नारायणाय नम: मंत्राचा जप करावा.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
कर्क - श्री हरिविष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कर्क राशीचे लोकांनी मोक्षदा एकादशीला देवाला पिवळी फुले अर्पण करावी.
सिंह - मोक्षदा एकादशीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला गूळ अर्पण करावा आणि त्यांना पंचामृताने अभिषेक देखील करावा.
कन्या - कन्या राशीचे लोक भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवंताला पिवळे चंदन लावतात.
तूळ - मोक्षदा एकादशीच्या शुभ सणाला तूळ राशीच्या लोकांनी विष्णूला कच्च्या दुधाने आणि गंगा जलाने अभिषेक करावा आणि त्यांची विधिवत पूजा करावी.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला दही आणि मधाने अभिषेक करावा आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:चा जप करावा.
धनु - धनु राशीच्या लोकांनी मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णूला पिवळी फुले आणि वस्त्र अर्पण करावे.
मकर - मोक्षदा एकादशीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी श्री विष्णू चालिसा चे पठण करावे.
कुंभ- मोक्षदा एकादशीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी आणि हळद कुंड अर्पण करावेत.
मीन - मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी ॐ विष्णूवे नमः या मंत्राचा जप करावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या