Mohini Ekadashi 2024 : हिंदू धर्मात अनेक उत्सव साजरे केले जातात.त्यातीलच एक म्हणजे एकादशी होय. एकादशीला शास्त्रानुसार प्रचंड महत्व आहे. मान्यतेनुसार, एकादशी दिवशी व्रतवैकल्य केल्याने विष्णू देव आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. येत्या १८ मे २०२४ रोजी मोहिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. यादिवशी शुक्र ग्रह मेष राशीतून वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा फायदा राशीचक्रातील काही राशींना होणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मोहिनी एकादशी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. येत्या १८ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजून मिनिटांनी मोहिनीच एकादशीचा आरंभ होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ मे रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ही एकादशी समाप्त होईल.
हिंदू शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी होय. एकादशीला विष्णू देवाची अत्यंत प्रिय तिथी म्हणून संबोधले जाते. प्रत्येक महिन्यात २ अशाप्रकारे एका वर्षात २४ एकादशी साजऱ्या केल्या जातात. तर अधिक महिन्यात एकूण २६ एकादशी असतात. शास्त्रानुसार, एकादशी देवी या भगवान विष्णूचा रुप आहेत. या दिवशी त्यांनी प्रकट होत मूर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवसाला एकादशी तिथी म्हणतात.
मेष राशीच्या लोकांसाठी मोहिनी एकादशीचा सकारत्मक परिणाम दिसून येणार आहे. यादिवशी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. कमाईचे नवे मार्ग खुले होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ वार्ता कानावर पडतील. एकंदरीत मोहिनी एकादशीदिवशी मेष राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा मोहिनी एकादशी लाभदायक ठरणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना प्रगतीचा वेग वाढेल. नवनव्या संधी हाती लागतील. कुटुंबात एखाद्या नव्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरदारवर्गाला बढती मिळून पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
मोहिनी एकादशी दिवशी विविध ग्रहांचे संक्रमण होणार आहे. हे संक्रमण सिंह राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक चांगल्या संधी प्राप्त होतील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येईल. घरातील सदस्यांसोबत नातेसंबंध अधिक दृढ होतील.