Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची जुनी येणी वसूल होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची जुनी येणी वसूल होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची जुनी येणी वसूल होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 07, 2024 10:22 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 7 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज ७ मार्च गुरुवार रोजी, भागवत एकादशीचा चंद्र मकर राशीतुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज मंगळ-चंद्र युतीयोगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. समाजकारणाची आवड असल्यामुळे जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल.

शुभरंग: तांबडा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

वृषभः 

आज मंगळ-चंद्र योगात प्रयत्न सफलदायक ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज चंद्र प्लुटोचा संयोगात नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्म विश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०९.

कर्क: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबा तील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारा सोबत दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

 

Whats_app_banner