Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज पापमोचनी एकादशीचा चंद्र मकर राशीतून भ्रमण करीत आहे मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
आज चंद्राचे गोचर विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
आज चंद्रभ्रमण शुभ स्थानातुन होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.
आज शुभ योगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्या मुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका हेलपाट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मना प्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.
आज चंद्राचं बल चांगलं लाभल्याने कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.
संबंधित बातम्या