Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : कर्क राशीच्या लोकांना नावलौकीक मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : कर्क राशीच्या लोकांना नावलौकीक मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : कर्क राशीच्या लोकांना नावलौकीक मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published Mar 04, 2024 10:40 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 4 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज ४ मार्च सोमवार रोजी, अष्टमीचा चंद्र गुरू आणि मंगळाच्या राशीतुन तर बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्राचं बुधाच्या नक्षत्रातुन होत असणार भ्रमण पाहता तुमच्या हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल.नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल.

शुभरंग: नांरगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज गुरूशी होणारा चंद्रयोग पाहता किरकोळ मुद्यांवर तात्त्विक वाद उकरून काढाल. इतरांना होणाऱ्या त्रासाची अजिबात पर्वा करणार नाही परंतु यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. नियोजीत कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्क: 

आज चंद्र-नेपच्युन संयोग पाहता उद्योगक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाही. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. व्यापारात काहीबाबतीत अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

Whats_app_banner