मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 03, 2024 08:47 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 3 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

 मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज ३ मार्च रविवार रोजी, चंद्र भानुसप्तमीचा चंद्र मंगळाच्या राशीतुन आणि शनिच्या नक्षत्रातुन भ्रमण करीत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्रभ्रमणात आपली मानसिक अवस्था दोलायमान रहाणार असली तरी पूर्वीचा अनुभव तुम्हाला असलेले ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.

वृषभः 

आज चंद्राचा मंगळाशी योग होत आहे. धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

मिथुन: 

आज शुभ स्थानात चंद्र असणार आहे. आपली कामे करून घेण्यासाठी एखादे वेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरा मध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे. पूर्ण स्वार्थ व स्वार्थ त्याग अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. समानसिक स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्कः 

आज योग चांगले आहेत. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्‌भवतील. परिवारातून शुभ संदेश मिळतील. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel