मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना प्रतिस्पर्धी वरचढ होतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना प्रतिस्पर्धी वरचढ होतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 29, 2024 12:52 PM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 29 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज चंद्र गुरूच्या नक्षत्रातुन आणि शुक्र व मंगळाच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र शुभ स्थानातून भ्रमण करतोय. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात पार्टनरच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. जीवनाकडे पहाऱ्याचा दृष्टीकोन खेळकर हवा. प्रवासयोग परदेशी जाण्या संबंधात काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभः 

आज लाभातील चंद्रबल पाहता आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मिथुनः 

आज चंद्राचं अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.

कर्क: 

आज मंगळाशी होणारा चंद्राच्या योग पाहता घरामध्ये प्रेमाचा ओलावा मिळण्यासाठी जरा जास्तच किंमत मोजावी लागेल. त्यामुळे अस्थिरता जाणवेल. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल.योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लागेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. दिवस शुभ आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०७, ०८.

WhatsApp channel