मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस योगकारक

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस योगकारक

HT Marathi Desk HT Marathi
Mar 27, 2024 12:09 PM IST

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : चंद्र-मंगळ योग, शुक्र-चंद्र योग मेष वृषभ आणि मिथुन राशीसाठी आज यशदायी ठरणार आहे.

मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस योगकारक
मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस योगकारक

मेष

चंद्राचा मंगळाशी योग होत आहे. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे मार्ग दिसतील. प्रेमी युगुलांसाठी अनुकूल काळ आहे. नोकरीत महत्त्वाची कामं स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास अनेक अडचणी दूर होतील. आर्थिक कामं मार्गी लागतील. दिवस अनुकूल असेल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यशदायी दिवस आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. कायदेशीर कामं मार्गी लागतील. नोकरीच्या बाबतीत धाडसी निर्णय घ्याल. पत्नीची साथ लाभेल. व्यापारात भागीदाराचं उत्तम सहकार्य लाभेल. शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण. शुभअंकः ०४, ०६.

वृषभ

शुक्राशी आणि चंद्राच्या योग कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी संधी देणारा असेल. कामातील बदल उत्साह वाढवणारा ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची योजना आखली जाईल. घरातील काही प्रश्नांवर एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. व्यवसायवाढीसाठी दिवस अनुकूल आहे. जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचा योग आहे. मन प्रसन्न राहील. बोलताना संभ्रम ठेवू नका. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. स्वतःच्या मनानं विचार करून निर्णय घ्या. आत्मविश्वासानं भरलेले असाल. शुभरंग: नारंगी शुभदिशा: आग्नेय. शुभअंकः ०२, ०७.

मिथुन

ग्रहयुती अनुकूल आहे. धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. नवीन बदल आत्मसात केल्यास यशाचा आलेख उंचावेल. मनोधैर्य उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेनं अधिक लाभ होतील. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात आल्यानं फायदा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर. शुभअंकः ०३, ०६.

कर्क

व्याघात योगात विचार पूर्वक निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबात आणि बाहेर काही प्रमाणात संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांशी न पटल्यामुळं तणाव निर्माण होईल. व्याधींना तोंड द्यावे लागेल. युक्तीनं काही गोष्टी केल्यास यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतीकडं लक्ष द्या. उद्योग-व्यवसायत प्रगती होईल. खर्च करताना विचारपूर्वक करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. तीर्थयात्रेचा योग आहे. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत. शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य. शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel