Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज अहोरात्र चंद्र शुक्राच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने परदेशगमना साठी अडचणी उद्भवतील. नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.
शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.
आज चंद्रबल अनिष्ट आहे. समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. कधी कधी दुसऱ्यांचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०३, ०५.
आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असल्याने आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करवून घ्याल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्र-केतु योगात स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करियर करणारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०८.
संबंधित बातम्या