Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज २५ मार्च सोमवार रोजी, चंद्र बुधाच्या राशीतुन आणि मालकीच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
आज चंद्राचं स्वतःच्या मालकीच्या नक्षत्रातुन होणार भ्रमण पाहता थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगल कार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.
आज ग्रहणयोगात आपल्या हातून आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी असणारांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढा राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. इतरांवर जास्त विश्वासटाकत नसल्यामुळे कामाचा गाडा स्वत: ओढाल परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०४.
आज ग्रहबलं लाभल्याने पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच शक्ती खर्च करावी लागेल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्या मुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.
शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
आज रवि चंद्र प्रतियोगात आर्थिक स्थिती बरी राहिल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजू बाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०४.
संबंधित बातम्या