मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीच्या लोकांनी कर्ज घेण्यापासून दूर राहा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीच्या लोकांनी कर्ज घेण्यापासून दूर राहा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 22, 2024 10:13 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 22 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज २२ मार्च शुक्रवार रोजी, प्रदोष दिनी चंद्र सुर्याच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र मंगळ प्रतियोगात उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल. परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकां मध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०७.

वृषभ: 

आज शनि चंद्र प्रभावात कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०३, ०६.

मिथुन: 

आज केतुचं नक्षत्र अनुकुल राहिल. मित्र मंडळींच्या सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु तेथे मात्र निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील तरी कामे व्यवस्थित पार पाडण्याकडे कल राहील. त्यासाठी आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धरून ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.

कर्क: 

आज चंद्र गोचरात मनातील उत्तेजना वाढीस जाईल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडणाचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेला बरा राहील. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा रहिल. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. चंगळवादा कडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel