Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना कामाचा ताण जाणवेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना कामाचा ताण जाणवेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना कामाचा ताण जाणवेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 21, 2024 10:21 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 21 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज २१ मार्च गुरुवार रोजी, चंद्राचा प्लुटोशी प्रतियोग आणि शनि बरोबर दृष्टीयोग घटीत होणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र शुभ योगात असताना नोकरी व्यवसाया च्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधीचे दान तुमच्या पदरात टाकण्यासाठी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०७.

वृषभः 

आज प्लुटो-चंद्र युतीयोगात धार्मिक गोष्टी करण्या साठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०४.

मिथुनः 

आजच्या चंद्र गोचरात वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्या मुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०६.

कर्कः 

आज चंद्रभ्रमण अनुकुल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. तुमच्याषबुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

Whats_app_banner