Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope Today : चंद्रभ्रमणात आज या राशींना मिळणार लाभ, असं आहे रविवारचं राशी भविष्य! पाहा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope Today : चंद्रभ्रमणात आज या राशींना मिळणार लाभ, असं आहे रविवारचं राशी भविष्य! पाहा

Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope Today : चंद्रभ्रमणात आज या राशींना मिळणार लाभ, असं आहे रविवारचं राशी भविष्य! पाहा

Mar 24, 2024 08:43 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 24 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : चंद्रभ्रमणात आज या राशींना मिळणार लाभ, असं आहे रविवारचं राशी भविष्य! पाहा
Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : चंद्रभ्रमणात आज या राशींना मिळणार लाभ, असं आहे रविवारचं राशी भविष्य! पाहा

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today 24 march : आज रविवारी (२४ मार्च) हुताशनी पौर्णिमेचा चंद्र सुर्याच्या नक्षत्रातुन आणि रवि, बुधाच्या राशीतुन भ्रमण करणार आहे. चंद्र केतुशी देखील संयोग करीत असुन ग्रहणयोग घटीत होत आहे. आज गंड योगात राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क यांच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? ते जाणून घेऊया.

मेषः आजचं चंद्रभ्रमण पाहता शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाज कारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रा मध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्या मुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे

शुभ रंगं: तांबूस

 शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०७, ०९.

वृषभः आज शुक्राशी होणारा योग पाहता गोचर चंद्रभ्रमणात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेश गमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्म विश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील.

शुभ रंगः भगवा 

शुभ दिशाः आग्नेय.शुभ अंकः ०४, ०७.

मिथुनः आजच्या चंद्रगोचरात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

 शुभ रंगः पोपटी 

शुभ दिशाः उत्तर.शुभ अंकः ०३, ०६.

कर्कः आजच चंद्रभ्रमणात चांगली फले मिळतील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापट पणाही वाढेल. तुमच्या  वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणासाठी चांगले वातावरण राहील. 

शुभ रंगः पांढरा 

शुभ दिशाः वायव्य.शुभ अंकः ०४, ०५.

Whats_app_banner