मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मेष राशीच्या लोकांनी संयम ठेवा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मेष राशीच्या लोकांनी संयम ठेवा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 02, 2024 12:58 PM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 2 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज २ मार्च शनिवार रोजी, चंद्र राहु नेपच्युनशी संयोग करत असुन षडाष्टक योग निर्माण होत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज गुरूच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशा संदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. अपघात भय संभवते.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.

वृषभ: 

आजच्या अशुभ ग्रहयोगात कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे सांभाळा, गहाळ होण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०७, ०८.

मिथुन: 

आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने मोडेन पण वाकणार नाही या वृत्तीमुळे यांचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०५.

कर्क: 

आज चंद्रभ्रमणात आनंदी आणि उत्साही मूड राहिल्यामुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी करून जाल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायलामिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०३, ०९.

WhatsApp channel