Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीचे लोकं स्वप्नांच्या दुनियेतच वावरतील! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीचे लोकं स्वप्नांच्या दुनियेतच वावरतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीचे लोकं स्वप्नांच्या दुनियेतच वावरतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published Mar 18, 2024 10:41 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 18 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज १८ मार्च सोमवार रोजी, चंद्रमा राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करतोय. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आजचं चंद्रभ्रमण आपणास भाग्यकारक अनुभव देणारा आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकरांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर रहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

वृषभः 

आजचं चंद्रभ्रमण पाहता मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. साथीदाराचे सहकार्य लाभल्या मुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगती कारक आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज राहुच्या नक्षत्रातुन होणार चंद्रगोचर पाहता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. सर्वच स्तरातील नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्कः 

आज चंद्रबल लाभल्याने नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. त्यामुळे मानमरातब आपोआप घर चालत येईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. त्याबरोबरच उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींची प्रक्रीया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. शारिरिक कामात वाढ करण्याचा प्रयत्न करा.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०३, ०४.

 

Whats_app_banner