मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : पदोन्नती व प्रगतीचा शुक्रवार! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : पदोन्नती व प्रगतीचा शुक्रवार! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 15, 2024 11:10 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 15 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज १५ मार्च शुक्रवार रोजी, चंद्र वृषभ राशीत संक्रमण करेल व रमंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज चंद्रबल मिळाल्याने ठोस निर्णय घेऊ शकाल. नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल, पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. 

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

वृषभ: 

आज चंद्र-शुक्र योगात आपणास शुभ-अशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशी वृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

मिथुन: 

आज मंगळ-चंद्र योग आपणास आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. थोराचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.

कर्क: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.