मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची कामे मनासारखी होतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची कामे मनासारखी होतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 14, 2024 10:28 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 14 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज १४ मार्च गुरुवार रोजी, चंद्र मेष राशीत संक्रमण करेल व रवि गुरूच्या राशीत प्रवेश करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज रविचा राशीबदल पाहता आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. एकप्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. मित्रमैत्रिणीच्या नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.

वृषभः 

आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. व्यवसायिकांनाही आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. घरासंबंधी समस्या होऊ शकते. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०७, ०९.

मिथुन: 

आज चंद्रबल लाभल्याने विश्वासदर्शक वातावरण राहिल. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तीशी संबंध प्रस्थापित होतील. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काही समाधान लाभेल. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.

कर्कः 

आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात भांवडांशी आपले मतभेद होऊ शकतात. तुम्ही मूळ सोशिक आहात परंतु प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. थोडेसे धूर्त संयमितपणा बरोबरच धोरणी रहाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. वाद टाळणे हितावह होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel