मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : उत्तम ग्रहयोगात आनंदी व उत्साही वातावरण लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : उत्तम ग्रहयोगात आनंदी व उत्साही वातावरण लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 13, 2024 10:34 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 13 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज १३ मार्च बुधवार रोजी, चंद्र मेष राशीत भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज गजकेसरीयोगात आपणास अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभः 

आज ऐंद्र योगाच्या प्रभावात आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ रहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. उद्योग व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०६, ०९.

मिथुनः 

आज चंद्रभ्रमण अनुकूल असल्याने नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. परदेशगमनाचे योग येतील. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभणार आहे. प्रवासातून लाभ होईल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्कः 

आज गुरू-चंद्र संयोगात आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढा राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल. आपली आर्थिक बाजु भक्कम राहिल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०६.