मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना ताणतणाव जाणवेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना ताणतणाव जाणवेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 12, 2024 10:47 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 12 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज १२ मार्च मंगळवार रोजी, चंद्र बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असतील. नवीन घर खरेदीचा योग आहे. सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. आपल्या वस्तुची देख भाल कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करता येईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. संगीत कार व गायक वादक यांना संधी मिळेल. शेअर्स मधील गुंतवणूकीसाठी उत्तम दिवस आहे. मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील. मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

वृषभः 

आज चंद्रगोचर शुभ असल्याने आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणी कडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत चांगले संकेत मिळतील. व्यापारात नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज चंद्र बुधाशी योग करीत असल्याने शारिरिक स्वास्थ सांभाळा. अति कर्तव्यनिष्ठतेमुळे एखादे वेळी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्या मुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्थ्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मित्रमैत्रिणीं सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावे. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०४, ०८.

कर्क: 

आज चंद्र-बुध संयोगात महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यापार व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल दिनमान आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया. नातेवाईक मित्रमंडळी यांच्या सह फिरण्याचा योग उत्तम आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. धार्मिक व्यक्तिंच्या सहवास लाभेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०६, ०९.

WhatsApp channel