मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीच्या लोकांना प्रवासातुन मोठे लाभ घडतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : वृषभ राशीच्या लोकांना प्रवासातुन मोठे लाभ घडतील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 11, 2024 09:18 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 11 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज ११ मार्च सोमवार रोजी, चंद्रदर्शनाचा शुभ योग असून, चंद्र मीन राशीत संक्रमण करत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र-नेपच्युन संयोगात केंद्र अत्यंत महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. कुंटुंबात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास हितकर होतील.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०९.

वृषभः 

आज राहु-चंद्र योग आपणास आर्थिक लाभ होईल. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. नोकरदारासाठी सफलदायक दिवस असणार आहे. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्‍या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्यही उत्तम राहील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०४.

मिथुनः 

आजचं ग्रहमान पाहता व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंते पासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगा. व्यापारी वर्गाकरीता ग्रहयोग उत्तम आहेत. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवनवीन कल्पना आमलात आणा. कठीण प्रसंगात विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. दिनमान शुभ दिवस आहे. नवीन रोजगारात यश संपादन होईल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

कर्कः 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. आपणास व्यापारात अनपेक्षीत हानी होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसान घडण्याची शक्यता आहे. प्रवास नुकसानकारक राहील. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशा जनक वातावरण राहील. सहकाऱ्याकडून विरोध व असहकार्य लाभेल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०७, ०८.

WhatsApp channel