मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : पहिला दिवस कामकाजासाठी शुभ! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : पहिला दिवस कामकाजासाठी शुभ! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 01, 2024 10:27 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya today 1 march 2024 : राशीचक्रातील पहिल्या चार राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini Cancer
Aries Taurus Gemini Cancer

Mesh Vrishabh Mithun kark horoscope today : आज १ मार्च शुक्रवार रोजी, षष्टीचा चंद्र अहोरात्र गुरू,राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज ध्रुव योगाय व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकाल. समस्यांना तोंड देण्याची धमक निर्माण होईल. घर बदलण्याचे योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. व्यवसायात अपेक्षित पैसे लवकर हाती न पडल्यामुळे स्पर्धक त्याचा फायदा घेतील. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील पत वाढेल. शेअर बाजार आणि विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

वृषभः 

आज चंद्र शुभस्थानातून गोचर करत असताना कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्यनिष्ठेने त्या पारही पाडाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी कष्ट घेतले तरचं मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. शासकीय कामकाजा साठी शुभ दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०९.

मिथुनः 

आज लाभ देणारी रवि-चंद्र नवमपंचम योग पाहता उद्योग तेजीत राहतील. किर्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. तुमच्यातील कलेला समाजा तील लोकांची दाद मिळेल. केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. बंधुप्रेम मिळणार आहे. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.

कर्कः 

आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहिल्यामुळे नोकरी व्यवसायात त्याचा कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळावेत. परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणा आढळणार नाही. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.