मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांना होणार शशी योगाचा लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांना होणार शशी योगाचा लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 09, 2024 09:50 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 9 May 2024 : चंद्र आज वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मात्र त्याठिकाणी आधीपासूनच असलेल्या गुरुसोबत संयोग घडून येणार आहे. अशात मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

 मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज गुरुवार ९ मे २०२४ रोजी चंद्र वृषभ राशीत ठाण मांडून असणार आहे. मात्र त्याठिकाणी गुरु आधीपासूनच विराजमान आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे शशी योगाची निर्मिती होत आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम राशीचक्रातील राशींवरसुद्धा दिसून येणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमची रखडलेली कामे बऱ्यापैकी पूर्ण होतील. कोणत्याही कामात भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. घरातील वरिष्ठांचा सलोखा लाभेल.जोडीदारासोबत नातेसंबंध अधिक दृढ होतील.

शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. दिवसभर सामान्य घडामोडी घडतील. इतरांसोबत वादविवाद करणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल. व्यापाऱ्यांनी मोठी उधारी आज करु नये. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. सरकारी कामा संदर्भातील व्यक्तींनादेखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारासोबत तसेच कुटुंबातील वातावरण समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग जुळून येतील. मानसिक समाधानामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. नवे रोमांचकारक अनुभव घ्यायला मिळतील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी महत्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता वाटू शकते. इतरांसोबत तुमचे आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहक्काने धन आणि संपत्ती लाभणार आहे. व्यवस्यात नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग जुळून येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यांसारखे धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. नोकरदारवर्गाला कार्यात मनासारखे यश मिळेल. मात्र उद्योग धंदयातील लोकांची एकाग्रता कमी होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. धनप्राप्तीचे नवे मार्ग सापडतील त्यामुळे आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारेल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel