Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज सुट्टीचा दिवस खास असणार आहे. आजच्या दिवशी चंद्र मिथुन आणि कर्क राशीतून व पुनर्वसू नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे आज वृद्धी योग व वणिज करण असणार आहे. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा असणार ते जाणून घेऊया.
आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तितकेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक गती आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहक्काने धन व संपत्ती लाभणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यांसारखे धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
तुमच्या नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.
तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. दूरच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या आणि प्रतिष्ठित घराण्याचा स्नेह प्राप्त होईल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
शुभरंग: पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.
संबंधित बातम्या