Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मेष राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मेष राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मेष राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published Apr 09, 2024 10:33 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 9 April 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मीन राशीत संक्रमण करत असून, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि चैत्र नवरात्रारंभ होत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र बलवान असल्याने बौद्धीक गोष्टींकडे ओढा राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.

वृषभ: 

आज चंद्र भ्रमणातून शुभ फलदायी घटना घडणार आहेत. तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. या कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज किस्तुघ्न करणात अविचाराची लक्ष्मणरेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहू शकतो. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

कर्क: 

आज चंद्र बुध संयोगात खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडणार नाही. या स्वभावामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील. नोकरीत थोडा दूरदर्शी पणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. चंद्रावर शनीची दृष्टी असल्याने मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

Whats_app_banner