आज ८ मे बुधवारचा दिवस राशीचक्रातील राशींसाठी कमी अधिक प्रमाणात फायद्याचा आणि नुकसानीचा असणार आहे. आज चंद्रापासून दुसऱ्या घरात गुरु तसेच बाराव्या घरात मंगळ आणि बुध असल्याने काही खास शुभ योग जुळून येत आहे. याचा परिणाम मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीवर कसा होणार हे जाणून घेऊया.
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.शास्त्रानुसार आज जुळून येत असलेल्या त्रियोगाचा बराचसा फायदा या राशीला प्राप्त होणार आहे. व्यवसायात उत्तम जम बसेल. दिवसभर मन उत्साही राहील. मात्र शत्रूंपासून सावधानता बाळगावी लागेल. सार्वजनिक कामाची आवड राहील. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक-सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी एकदा विचार करणे फलदायी ठरेल. साहित्यिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा विस्तार वाढेल. कलागुणांना वाव मिळेल.
शुभरंगः केसरी, शुभदिशाः दक्षिण, शुभ अंकः ०४, ०७.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. अनेक दिवसांपासून नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक महिला कार्यकर्त्यांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने अडचणींचा सामना कराल. हातात घेतलेल्या कामात यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडासा बदल केल्यास स्वास्थ्य उत्तम राहील.
शुभरंगः भगवा शुभदिशाः आग्नेय शुभअंकः ०४, ०७.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. मात्र अनावश्यक खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. कोणतीही खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दयावे लागेल. कुटुंबात परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून कोणतंही लाभ होणार नाही. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धीकडून मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदली हवी असणाऱ्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते.
शुभरंगः हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०९.
आज बुधवारचा दिवस कर्क राशीसाठी चांगला असणार आहे. आज भाग्य देवता तुमच्यावर पूर्णपणे प्रभावित असणार आहेत. जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून उत्तम फायदा मिळू शकतो. मनात आखलेल्या योजना अंमलात आणण्यात यशस्वी व्हाल. घरामध्ये समारंभाचे नियोजन तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने कराल. व्यवसायिकांना हा काळ अनुकूल आहे. तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. पतीपत्नीतील मतभेद दूर होऊन संबंध अधिक दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल.
शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०४.