Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : तैतिल करणात वृषभ राशीला मिळणार जोडीदाराची साथ!वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : तैतिल करणात वृषभ राशीला मिळणार जोडीदाराची साथ!वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : तैतिल करणात वृषभ राशीला मिळणार जोडीदाराची साथ!वाचा चारही राशींचे भविष्य

Published Jun 08, 2024 09:49 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 8 june 2024 : आज शनिवारच्या दिवशी राशींवर गंड योग व तैतील करणाचा प्रभाव असणार आहे. अशात मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी दिवस कसा जाईल, जाणून घ्या.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : जोतिषशास्त्रानुसार, आज चंद्र मिथुन राशीतून आणि आर्द्रा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तसेच आज गंड योग व तैतील करण असणार आहे. या योगात मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार ते जाणून घेऊया.

मेष

जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी येणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्याकडून सहकार्य लाभेल. सामाजिक स्तरावरील परीवर्तन आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत चिंतीत राहाल.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.

वृषभ

आज तुम्हाला जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मानसन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता उत्तम योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०३, ०९.

मिथुन

आज तुम्हाला प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटुंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून तुमच्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्क

कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअरसंबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. कार्यक्षेत्रात सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. संपत्ती देवाणघेवाणीचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०३, ०९.

Whats_app_banner