Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीच्या लोकांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीच्या लोकांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीच्या लोकांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे! वाचा चारही राशींचे भविष्य

May 07, 2024 10:45 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 7 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मेष राशीत संक्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या सर्व हालचालींचा चांगला-वाईट परिणाम राशीचक्रातील राशींवर होऊ शकतो. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्रगोचर शुक्राशी शुभ संयोग करत आहे. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल. दुरवरचे प्रवास घडतील. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. परंतु यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

वृषभ: 

आज बुधाशी होणारा चंद्राच्या योग पाहता व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. 

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. 

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्कः 

आज बुधाशी होणाऱ्या नवमपंचम योगात विचार पूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

Whats_app_banner