मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत बदलीची शक्यता! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत बदलीची शक्यता! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 07, 2024 09:18 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 7 june 2024 : आज चंद्रदर्शन आणि करीदिन आहे. तसेच आज दिवसभर चंद्रावर शनीची पूर्ण दृष्टी असणार आहे. अशात मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी दिवस कसा जाईल, जाणून घ्या.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : जोतिषअभ्यासानुसार आज सूर्य मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तसेच आज चंद्रदर्शन आणि करीदिनसुद्धा आहे. आज दिवसभर चंद्रावर शनीची दृष्टी असणार आहे. यामध्ये आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीसे नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहेत. आज आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०७.

वृषभ

आज कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरावे लागेल. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. विरोधक हितशत्रुकडून तुमच्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०३, ०५.

मिथुन

आज चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास बसेल. जास्तीत जास्त एकटे राहणे पसंत कराल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत इतरांवर विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.

कर्क

मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. क्रीडा क्षेत्रात करियर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यवहारात नोकरीत तुमच्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. तुमच्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०८.

WhatsApp channel