मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मेष राशीच्या लोकांचा व्यवसाय विस्तारणार! वाचा राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मेष राशीच्या लोकांचा व्यवसाय विस्तारणार! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 06, 2024 08:43 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 6 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मीन राशीत संक्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या सर्व हालचालींचा चांगला-वाईट परिणाम राशीचक्रातील राशींवर होणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेष

आज मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहयोग अतिशय शुभ आहे. त्यामुळे दिवसभर मनाप्रमाणे कामे होतील. कला क्षेत्रातील लोकांनी हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिमा उंचावेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फलदायी ठरेल. रोजगारात नवीन योजना राबवाल. स्थावर मालमत्ता घेण्यासाठी प्रयत्न कराल. घरातील वातावरण आनंदी राहील.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. तुमच्या मितभाषी स्वभावामुळे लोक आकर्षित होतील. आजूबाजूच्या वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यावसायिक प्रस्ताव येतील. घरामध्ये आनंददायक वातावरण राहिल. अचानक घडून आलेल्या प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस विविध अनपेक्षित घडामोडींचा आहे. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या कधी कधी चांगल्या संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. ऑफिसमध्ये मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कोणत्याही कामाबाबत निष्काळजी राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे आणि आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.

कर्क

विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. क्रीडा क्षेत्रात करियर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यवहारात किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक लाभ होईल. भागीदारीत आर्थिक लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कामानिमित्त प्रवास घडून येईल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०८.

WhatsApp channel