Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : चंद्र आज वृषभ राशीतून आणि रोहिणी नक्षत्रातून गोचर करणार आहे. तसेच वैदिक शास्त्रानुसार आज दर्श भावुका अमावास्या आणि शनैश्चर जयंती आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या योग आणि तिथींचा मोठा परिणाम राशींवर पडत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा असणार ते जाणून घेऊया.
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा व्याप बराच कमी कराल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी पुरेसा वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणीच्या गाठीभेटी होतील. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. तुमच्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.
शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्मप्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा संपत्तीविषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०३, ०६.
मिथुन राशीच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन थोडेसे अस्थिर असले तरी कामे व्यवस्थित पार पाडण्याकडे कल राहील. त्यासाठी आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धरून ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. दिवस धावपळीचा असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिला धार्मिक गोष्टींमध्ये सहभागी होतील. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा रहिल. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. अनावश्यक चैनी करण्याकडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.