मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope: मेष राशीसाठी आजचा दिवस आश्चर्यकारक; वाचा चारही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope: मेष राशीसाठी आजचा दिवस आश्चर्यकारक; वाचा चारही राशींचे राशीभविष्य

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 05, 2024 11:11 AM IST

Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope: राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क यांच्यासाठी आज ५ मे रविवारचा दिवस कसा जाईल? यासाठी पाहूया आजचे राशीभविष्य.

Mesh Vrishabh Mithun Kark
Mesh Vrishabh Mithun Kark

Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope: जोतिषशास्त्रानुसार आज प्रदोष दिन आहे. आजच्या दिवशी चंद्र मीन राशीतून तसेच पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे अहोरात्र वैधृती आणि विष्कंभयोग असून कौलव व गजकरणसुद्धा तयार होत आहे. आज रविवारचा दिवस मेष, वृषभ,मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी कसा जाणार  घेऊया. 

मेष

राशीचक्रातील पहिली राशी म्हणून मेष राशीला ओळखले जाते. आजचा दिवस मेष राशीसाठी सामान्य असेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्याचा धैर्याने सामना कराल. विवाहित लोकांना सामंजस्यपणे वागावे लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा मनस्ताप होईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कामानिमित्त प्रवास होईल. मानसिक त्रास जाणवेल. तुमच्या भावनांवर ताबा ठेवा. त्यामुळे मोठे मतभेद होणार नाहीत.

शुभ रंग: केसरी

शुभ दिशा: दक्षिण 

शुभ अंकः ०४, ०७

Todays Horoscope 5 May 2024: चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज वैधृती योगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. जवळच्या व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. घरात धार्मिक कार्याची योजना आखली जाईल. प्रगतीचे मार्ग खुले होतील. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. 

शुभ रंग: भगवा

शुभ दिशा: आग्नेय

शुभ अंकः ०२, ०७

अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनी आज विष्कंभ योगात व्यापारात अती उत्साहीपणाने कोणतेही निर्णय घेऊ नका. मानसिक तणाव जाणवेल. आजचा दिवस अडचणीत आणणारा ठरु शकतो. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरेकपणा टाळा. स्वतःचे मानसिक स्वास्थ सांभाळा. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईआत्मविश्वासाची कमतरता भासेल. व्यवसायात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. पैसे उधार घेताना काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याच्यादृष्टिकोनातून खर्चिक दिवस आहे.

शुभ रंग: पोपटी

शुभ दिशा: उत्तर

शुभ अंकः ०५, ०९

Lucky Sign On Palm : नशीबवान लोकांच्या हातात असते अशी खूण; वयाच्या ३५ व्या वर्षीच होतात मालामाल

कर्क

आज चंद्र अनुकूल स्थितीत असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कार्य कराल. परदेशवारी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत  व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. दिवसभर आनंदी आणि ऊत्साही राहाल. मित्रांकीडून आर्थिक सहकार्य मिळेल. कौटुंबिक आयुष्यात संबंध चांगले राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिवस आहे. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. पती पत्नीसोबतअसलेले जुने वाद मिटतील. जोडीदारसोबतचे नाते आणखी घट्ट होईल. समाधानकारक दिवस जाईल.

शुभ रंग: पांढरा

शुभ दिशा: वायव्य

शुभ अंकः ०४, ०६

WhatsApp channel